हळद

हळद

Category

कंद पिके

हळद

हळद पिक नियोजन

♦️ जमिनीची मशागत :एप्रिल महिन्यात जमिनीची सखोल नांगरटी करुन जमिन 40 ते 45 दिवस चांगल्या प्रकारे तापु द्यावी. बेड तयार करण्या अगोदरसिंगल सुपर फॉस्फेट - 1 बॅगजय संजिवनी - 5 किलोमिश्रण करुन प्रति एकरी शिंपावे व पाळी करुन बेड तयार करावे, दोन बेड मधील अंतर 4 फुट ठेवावे व बेडचा आकार 1.5 (दिड) फुटाचा रुंद व 10 इंच उंचीचा बनवावा. प्रक्रिया केलेले शेणखत असल्यास बेडवर टाकुन ठेवावे.

♦️ बियाणे निवड :आपणांस बंडा अथवा शेंग घ्यायवयाची असल्यास बेणे निवड हा एक महत्वाचा भाग आहे. बुरशीयुक्त किंवा मागील वर्षी सड लागलेल्या शेतामधील बेणे मुळीच घेऊ नये. शेंग घेतल्यास 2 ते 5 इंचापर्यंतचे बेणे घ्यावे. बारीक बेणे निवडुन बाजुला टाकावे.

♦️ बियाणे प्रक्रिया :प्रति एकरी 7 ते 8 क्विंटल बेणे पुरेशे आहे.

( प्रमाण : प्रति एकर )

स्कायगोल्ड जेल

250 ग्राम

ब्लु कॉपर

250 ग्राम

क्लोरो 50%

250 मि.ली

या तीनही घटकांचे 100 लिटर द्रावण तयार करुन त्यातुन सर्व बेणे ढवळुन काढावे व हे द्रावण नंतर बेडवर शिंपुन द्यावे.

♦️ लागवड :जुन महिन्यात लागवड करावी. चांगल्या ठोकर शेंगा लागवडीस घ्याव्या व ठिंबकच्या दोनही बाजुने समांतर लागवड करावी. कोळप्याने 1 फुटांचे अंतर घेवुन बेड वर चरी पाडून घेतल्यास लागवड उत्तम प्रकारे करता येते. दोन शेंगामधील उभे अंतर 10 इंच व आडवे अंतर 12 इंच असावे. शेंग किंवा बंडा टोकतांना 3 इंच खोल टोकावा.

♦️ पहिली आळवणी :लागवडीपासुन सातव्या दिवशी प्रती एकरी. (ड्रीप द्वारे द्रावण सोडणे)

स्कायगोल्ड जेल

1 किलो

ब्लू कॉपर

500 ग्राम

19:19:19

2 किलो

या घटकाचे 200 लिटर पाणी तयार करुन ठिंबक व्दारे सोडावे. ठिंबक नसल्यास पंपाचे नोझल काढुन धार सोडावी.

♦️ दुसरी आळवणी :(ड्रिप) लागवडीपासुन 16 ते 18 दिवसात हे द्रावण सोडावे.

( प्रमाण : प्रति एकर )

सुप्रीमो

2 लिटर

मिरॅकल

1 लिटर

या नंतर 5 ते 6 दिवसांनी खताचा भेसळ डोस टाकावा.

♦️ खताची पहिली मात्रा :लागवडीपासुन 22 ते 24 दिवसात खताची मात्रा टाकावी.

( प्रमाण : प्रति एकर )

डि.ए.पी

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

युरीया

25 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो

निबोणी पेंड

2 बॅग

पोटॅश

25 किलो

वरील सर्व घटकांचे मिश्रण करून बेड वर मधोमध टाकावे व त्यांतर ठिबक व्दारे पाणी सोडावे.

♦️ पहिली फवारणी :लागवडीपासुन 30 ते 32 दिवसात पहिली फवारणी करावी. (जुन्या फवारणीमध्ये बदल केलेला आहे.)

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

रोको

20 ग्राम

फायर 101

25 मि.ली

♦️या नंतर 5 ते 7 दिवसात खालील प्रमाणे 15 लिटर प्रती पंपाने दाट फवारणी करावी:

चॅम्पियन

1 मि.ली

गोल्ड रूट टॅबलेट

1 गोळी


♦️या नंतर लगेच शेतकरी मित्रांनी आपल्या शेतामध्ये हॅलोजन लाईट किंवा साधे लाईट लावावे. हे लाईट 20 जुलै पासुन तर 20 सप्टेंबर पर्यंत रोज रात्री चालु ठेवावे. म्हणजे कंद माशीचा प्रादुर्भाव आपल्या हळद पिकावर होणार नाही. एक मादीमाशी किमान 140 अंडे देते व या अंड्यातुन बाहेर पडलेल्या अळ्या पिकांच्या कंदाचे रस शोषण करतात व कंद पिळपिळे करतात व सड लागते म्हणुन लाईट लावणे हे आवश्यक कार्य आहे. लागवडीपासुन 45 ते 50 दिवसात दुसरी फवारणी करावी.

♦️ दुसरी फवारणी :लागवडीपासुन 45 ते 50 दिवसात दुसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

टील्ट

20 मि.ली

सोनाटा - 70

20 मि.ली


♦️ तिसरी आळवणी :एनर्जी 2 लिटर - 200 लिटरपाण्यामधून सोडावे.

♦️ खताची दुसरी मात्रा :लागवडीपासुन 60 ते 65 दिवसात द्यावी.

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

विघ्नहर्ता विकास किट

25 किलो


♦️ चौथी आळवणी :80 ते 90 दिवसाच्या दरम्यान 4 थी आळवणी करवी.

( प्रमाण : प्रति एकर )

स्कायगोल्ड जेल

2 किलो

ब्लु कॉपर

500 ग्राम

जीब्रॅक्स

1 लिटर

या नंतर 100 दिवसापासुन पुढे 4 महिन्यापर्यंत विद्राव्य खते आलटुन-पालटून द्यावी लागतात. ही खते कशाप्रकारे द्यावयाची यांचा तक्ता खालीलप्रमाणे दिला आहे.

♦️ खताचा प्रकार :

क्र.

खताचा प्रकार

प्रमाण

दिवस

1

19:19:19

8 किलो

110 दिवस

2

12:61:0

8 किलो

120 दिवस

3

13:40:13

8 किलो

130 दिवस

4

0:0:50

8 किलो

140 दिवस

5

19:19:19

8 किलो

150 दिवस

6

12:61:0

8 किलो

160 दिवस

7

13:40:13

8 किलो

170 दिवस

8

0:0:50

8 किलो

180 दिवस


♦️ तिसरी फवारणी :लागवडीपासुन 120 दिवसाला तिसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

महाझिंक

25 ग्राम

फेरोसील

25 ग्राम

बाल बोरॉन

30 ग्राम


♦️ हळद पिकावर येणारे रोग :खालील सर्व रोगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न या तंत्रात केलेला आहे.

♦️ कंदकुज व मुळकुज :या रोगाची लागण पिथीअप ॲफनीडर मॅटम या बुरशी मुळे होते. झाडांची पाने व कड़ा वाळून गळतात व झाडांचा बुंधा पांढरट दिसतो व नरम पडतो.

♦️ कंदकुज (गड्डेकुजव्या) :हुमणी किंवा अळीने कंदाचा रस शोषुन घेतल्यास कंद पिळपिळा होतो. अशा वेळेसडेटांसु, डेसिस 100किंवालिसेंन्टा - 100 ग्राम(या तीन पैकी कोणता हि एक घटक) वफायर 101 -250 मि.ली200 लिटर पाणी करुन प्रति एकरी सोडल्यास हुमणी किंवा अळ्या जमिनीच्या वरती येऊन मरतील.

♦️पानावरील ठिबके, कोरडी मर, पानावरील रस शोषुन घेणारा ढेकुन, सुत्रकृमि.

♦️ टिप :प्रत्येक फवारणीसरण 80 - 5 मि.लीप्रति पपं वापरणे बंधनकारक आहे.

♦️ टिप :माकड, हरीण, रोही, रानडुकरे यांच्या पासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठीकडुझ - 30 मी.लीप्रति पपं फवारणी करावी.