
उदासी तंत्र 2023
शेतीतज्ञ दिलीप उदासी
अमरावती विद्यापीठ येथून १९८६ या वर्षी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. १९८७ या वर्षांपासून खाजगी कृषी क्षेत्रात नोकरी करण्यास सुरुवात केली. २००२ पासून कापूस, तूर, मूग, उडिद या पीकांवर सखोल अभ्यास केला. २०१३ पासून शेतकर्यांना थेट माहितीपर मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरु केले. २०१८ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन शेतकर्यांना पुर्ण वेळ मार्गदर्शन देण्याचे निर्णय घेतले. फळबाग व ईतर पीकांवर सखोल अभ्यास केल्यानंतर शेतकर्यांना मार्गदर्शन देण्याची सुरुवात केली. २०१८-१९ मध्ये परभणी जील्ह्यातील हजारो शेतकर्यांना भरघोस उत्पादन मीळवून देण्यात यश आले. २०१९ मध्ये सातारा सांगली, सोलापूर पासून चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जळगाव पर्यंत सर्वच जील्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले. युट्युब व टेलीग्राम मार्फत मोफत सल्ला देण्याचे कार्य सुरु केले.