टमाटे
Category
फळभाज्या
टोमॅटो लागवड
भारतात घरा घरात रुचकर भाजीसाठी लागणारे टोमॅटो हे पिक भारतातील प्रत्येक राज्यात शेतकरी उत्पादन घेतात. मागील 50 वर्षाच्या कालावधीत अनेक जाती उदयास आल्या. तसेच नवीन जाती संशोधनाला गती आली, संकरीत वाणाचा शोध लागला. महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त टोमॅटोचे वाण खालील प्रमाणे निवडले जाते.
♦️ पुसारूढी :तिन्ही हंगामासाठी चालणारी व लवकर येणारी हि जात असून फळे मध्यम आकाराची व चपटी असतात. प्रती एकरी 150 क्विंटल पर्यंत या वाणाचे उत्पादन सहजपणे काढले जाते.
♦️ पुसाशीतल :हिवाळी हंगामामध्ये लागवडीला चालणारी व कमी तापमानात उत्पादन देणारी हि जात रंगाने लाल व आकाराने चपटी असतात. प्रती एकरी 160 ते 180 क्विंटल पर्यंत उतारा घेऊ शकतो. तसेच पुसा 120 , पुसा गौरव, अर्को सौरभ, अर्का गौरव, अर्का विकास, रोमा या नावाने सुद्धा या वाणाचे पीक प्रचलित आहे.
♦️ संकरीत जाती :हायब्रीड 1 आणि 2, हायब्रीड 10 आणि 111, एटीएच 1 आणि 2 वैशाली, रुपाली, शितल, रत्ना या संकरीत वाणाचे चलन सुद्धा महाराष्ट्रात प्रचलीत आहे.
♦️ टोमॅटो साठी अनुकूल हवामान :तापमान, सूर्यप्रकाश, आणि आर्द्रता यांचा एकत्रित परीणाम पीकाच्या वाढीवर होतो. 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान तसेच 10 ते 12 तास स्वच्छ सूर्यप्रकाश या पीकाला मिळाल्यास उत्पादन चांगले मिळते. अती थंडी पडल्यास झाडाची वाढ खुंटते, रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास फळ धारणा चांगली होते.
♦️ जमिनीची मशागत :भारी व मध्यम स्वरूपाची जमिन या पिकाला पोषक ठरते. नांगरटी अथवा पंजी केल्यानंतर पाळी करून घ्यावी. म्हणजेच जमिन निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे कार्य आवश्यक आहे.
♦️ पीकातील अंतर :5 x 2 , 5 x 2.5, 4 x 2 हे अंतर उदासी तंत्रामध्ये योग्य ठरले आहे. भारी व काळीची जमिन असल्यास 5 x 2 .5 असे अंतर घेऊन 3,484 रोपाची लागवड बेडवर करावी. मध्यम जमिन असल्यास 5 x 2 किंवा 4 x 2 हे अंतर घेऊन 4,356 किंवां 5,445 रोपाची लागवड प्रती एकरी करावी.
♦️ रोप प्रक्रिया :50 लिटर पाण्यात मिसळून रोपे बुडवून काढावी.
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
बाविस्टीन | 100 ग्राम |
♦️ पहिली आळवणी :लागवडी पासून 3 ते 4 दिवसात पिकाला पहिली आळवणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्काय गोल्ड जेल | 100 ग्राम |
ब्लू कॉपर | 100 ग्राम |
19 : 19 :19 | 100 ग्राम |
♦️ पहिली फवारणी :लागवडी पासून 14 ते 16 दिवसात पहिली फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्काय गोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
एलीयट | 15 ग्राम |
सोनाटा 70 | 25 मि.ली |
♦️ दुसरी फवारणी :वरील फवारणी नंतर बरोबर 7 व्या दिवशी दुसरी फवारणी करावी .
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
चाम्पियन | 1 मि.ली |
गोल्ड रूट टाब्लेट | 1 गोळी |
♦️ दुसरी आळवणी :दुसरी आळवणी 23 ते 24 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
मिरॅकल | 100 मिली |
सुप्रीमो | 200 मिली |
♦️ पहिला खताचा डोस :27 दिवसाला पहिला खताचा डोस द्यावा.प्रती एकरी द्यावे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
डी.ए. पी | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
ब्लॅकडायमंड | 10 किलो |
फुल धारणा अवस्थेत खालील फवारणी करावी. झाडाची बांधणी व्यवस्थित करावी.
♦️ तिसरी फवारणी :पिकावर काही फुले दिसल्यास तिसरी फवारणी करावी. फवारणी पूर्वी पाणी देणे आवश्यक आहे.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तिमान गोल्ड | 25 मि.ली |
सोनाटा 70 | 25 मि.ली |
यु.पी.एल कंपनीचे चे साफ | 25 ग्राम |
या फवारणी नंतर 5 दिवसाच्या अंतराने खालील फवारणी केल्यास पुन्हा अधिक फुले लागण्यास मद्त होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
फ्लॉवर किंग | 1 मिली |
फायर - 101 | 25 मि.ली |
♦️ तिसरी फवारणी :फळ धारणा होऊन बोराच्या आकाराचे फळ बनवताना खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
जीब्रॅक्स | 20 मि.ली |
सोनाटा 70 | 25 मि.ली |
♦️ टिप :जीब्रॅक्स -प्रमाण बरोबर घ्यावे अन्यथा फळ फाटण्याची शक्यता असते.
♦️या फवारणी नंतर विद्राव्य खते सोडवीत :
( प्रती एकर प्रमाण ) | |
|---|---|
20 :20 :0 :13 | 1 बॅग |
विघ्नहर्ता विकास कीट | 25 किलो |
( ठिबक असल्यास ) | |
|---|---|
12: 61: 0 | 5 किलो |
13 : 40 : 13 | 5 किलो |
0 : 0 : 50 | 5 किलो |
♦️ फवारणी -कोणत्याही प्रकारचा काळा डाग फळावर दिसल्यास, ताबडतोब धानुका कंपनी चे कोनिका प्रती पंप 25 मिली 5 दिवसाच्या अंतराने फवारणी दोनदा करावी. प्रत्येक तोडा झाल्यानंतर तीसरी फवारणी परत करावी. तसेच करपा लागत असल्यास,
बलवान - 25 मिली
वीगो - 25 ग्राम
♦️ फवारणी :फळ पोखरणारी अळी दिसत असल्यासफायर 101 - 25 मिलीप्रती पंप ने फवारणी करावी.
♦️ काळजी :फळ अवस्थेत आपल्या शेतामध्ये प्रती एकरी किमान 8 ट्रायकोग्रामा कार्ड लावावे. त्याच प्रमाणे कामगंध सापळे लावावे.