मोसंबी

मोसंबी

Category

फळबाग

मोसंबी

मोसंबी लागवड

भारतात अनेक राज्यात मोसंबी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश व पंजाब ही राज्ये मोसंबी उत्पादनात अग्रेसर आहेत. भारतात दरवर्षी जवळपास 30,000 मेट्रिक टनाचे मोसंबी पिकाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात सोलापूर, फलटण, बारामती, पुणे, नगर, वैजापूर, गंगापूर, कन्नड, जालना या भागात मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कमी-जास्त पाऊस डायबॅक, वाळवी, मुळकुंज असे अनेक समस्यामूळे शेतकरी फळबागेकडे दुर्लक्ष करत आहेत परंतू उदासी तंत्रामध्ये या सर्व समस्याचे निरासरण करता येत असल्यामुळे शतकऱ्याचे या पिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

ऊन, वारा, पाऊस, वादळ, गारपीट, पाऊस, रोगराई इ. कारणांनी तसेच भांडवल खर्च व पिकातील संकट याबाबतीत जर विचार केला तर संत्रा बाग किंवा द्राक्षे बाग यापेक्षा मोसंबीची बाग परवडते. मध्यम बांध्याचे व सदाहरीत डोलदार दिसणारे हे बाग आकर्षक असते. बहरलेले मोसंबीचे झाड वातावरणात सुगंध दरवळणारे असतात. तसेच वातावरण शुद्ध राखण्यास या झाडाची मदत होते. आहारात महत्वाचा दर्जा देणारे हे मोसंबी फळाचे महत्व तसेच लहान मुले, वयस्कर माणसे यांना पाचक ठरणारा मोसंबीचा रस हे सर्वांना ज्ञातच आहे.

मोसंबीच्या फळातील रसात जी साखर ती प्रामुख्याने ग्लूकोज प्रकारातील असते, त्यामूळे थकवा घालवण्यासाठी उपयुक्त असते. श्रमामुळे आलेला शिण ताबडतोब भरून निघतो.

♦️ जमिन :साधारणपणे मध्यम खोलीची सुपीक व काळी जमिन या पिकास चांगली मानवते. चुनखडीचे रान तसेच पाण्याचा निचरा न होणारे जमिन या पिका करता निवडू नये नये. जमिनीचा खालचा थर पक्या मुरुमाच्या किंवा कडक असल्यास अशीही जमिन निवडू नये.

♦️ हवामान :या पिकाला समशितोष्ण प्रकारचे हवामान मानवते. हवामानातील तापमान, सूर्यप्रकाश, आद्रता हे प्रमुख घटक वाढीवर, उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परीणामकारक ठरतात. उन्हाळ्यातील तापमान 38 अंश सें पेक्षा वाढले किंवा हिवाळ्यातील तापमान 8 अंश सें पेक्षा कमी झाले तर वाढीवर विपरीत परिणाम होतो. जास्त थंडी किंवा तापमान या पिकास घातक ठरते. मोसंबी पिकास सूर्यप्रकाश चांगला मानवतो. सावलीमध्ये तसेच ढगाळ वातावरणात वाढ आणि उत्पादनात विपरीत परिणाम होतो.

फळ वाढीच्या काळात दमट हवामान असेल तर फळाची साल पातळ राहून रसाचे प्रमाण वाढते, पण फळांना आकर्षक रंग येत नाही, या उलट कोरडे हवामान असेल तर फळांना आकर्षक रंग येतो तसेच सालही पातळ राहते. फळ वाढीच्या काळात उच्च तापमान असेल तर फळे लवकर पिकतात मात्र रसाची गोडी कमी राहते.

♦️ जाती आणि प्रकार :मोसंबी हे लिंबू वर्गातील फळ असून महत्वाचे फळ पीक समजले जाते. नारंगी रसाचा रंग असलेले स्वीट ऑरेंज असे इंग्रजीतील नाव या फळाचे आहे.

मोसंबीच्या विविध जाती खालील प्रमाणे आहेत :

मोसंबी

मास्टा ब्लड रेड

सातगुडी

व्हेल नशिया

सुक्कारी

डोब्ला फिना

जाफा

दिसा

पॉईन ॲपल

जी .एफ .ई

वॉशिंग्टन नॉव्हेल

वटावेन

शामुटी

रंगपूर

न्युशेलार

या पैकी मोसंबीच्या अनेक जाती आहेत पण आपल्या भागात रंगपूर व न्युशेलार या जातीच प्रचलीत आहेत व यांच दोन जातीचे बहूतांश भागात लागवड मोठ्या प्रमाणात केले जाते.

♦️ जमिनीची मशागत :मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील हवामान मोसंबीस अनुकूल आहे. मात्र या भागात जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. ज्या जमिनीत लागवड करावयाची आहे. तेथे मोजणी करून एकूण क्षेत्रफळाचे प्लॉट आखून घ्यावे. एका प्लॉटचा आकार 20 गुंठया पेक्षा लहान नसावा तसेच 50 गुंठया पेक्षा मोठा नसावा. निवडलेला प्लाट नांगरूण, कूळवून घ्यावा व सपाट करावा तसेच 100 मी अंतरासाठी 1 मी उतार याप्रमाणे ढाळ काढून घ्यावे. तसेच जमिनीचा उतार व निवडलेल्या प्लॉट या उतार लक्षात घेवून प्लॉटच्या उतारा संमातर आडवे आणि उभे चर खणावेत व ते एकमेकात भिडवावेत. हे चर बुझवणे आवश्यक आहे. परंतु याला माती वापरण्यापेक्षा दगड, गोटे, डबर, जाड बाळू, खडी, मुरूम यांचा वापर करून चर भरावेत. जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक असेल तर चर भरताना जीप्सम वापरावेत.

♦️ लागवडीचे अंतर :मोसंबीचे झाड डेरेदार आणि विस्ताराने वाढणारे असते. झाडांना सर्व बाजूनी भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळाली पाहिजे. त्यासाठी लागवड चौरस पद्धतीने उपयुक्त ठरते. मध्यम जमिनीला 16 x 16 फुटाचे अंतर व भारी जमिनीला 18 × 18 चे अंतर घेवून बेसलाईनच्या आधारे मोजणी करून 1 x 1 x 1 मी चे खड्डे करून या खड्यामध्ये पुढील प्रमाणे खताची मात्रा टाकावी.

शेणखत

1 किलो

सुफर्ट

500 ग्राम

निंबोळी पेंड

1 किलो

ब्लॅक डायमंड

500 ग्राम

या सर्व घटकाचे मिश्रण करून खड्डे भरावे. व यामध्ये मधोमध रोप लावावे. मुख्यतः शेष लागवड करण्याचा कालावधी मृग नक्षत्रात सात जून नंतरच करावा.

प्रथम वर्ष नियोजन

♦️ पहिली ड्रिचिंग :लागवडी पासून 11 ते 16 दिवसात पहिली ड्रिंचीग करावी. ठिबक असल्यास खालील घटक सोडावे.

( प्रमाण : प्रति एकर )

स्कायगोल्ड जेल

1.5 किलो

ब्लू कॉपर

1 किलो

12 : 61 : 0

3 किलो


♦️ दुसरी ड्रिचिंग :40 ते 45 दिवसात करावी

( प्रमाण : प्रति एकर )

सुप्रीमो

2 लिटर

मिरॅकल

1 लिटर


♦️ पहिली फवारणी :लागवडी पासून 60 ते 70 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

वीगो

25 मि.ली


♦️ दुसरी फवारणी :150 ते 180 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

सोनाटा 70

25 मि.ली

टिप

♦️झाडांना अतिवृष्टीमुळे मर लागत असल्यास नंबर 1 वर दिलेली ड्रिचिंग परत करावी.

♦️धुके किवा धुवारी पडत असल्यास शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस धूपन करावे. दुसऱ्या दिवशी खालील फवारणी करावी.

बलवान - 25 मिली
युपीएलचे साफ - 25 ग्राम



द्वितीय वर्षे नियोजन

♦️मृग नक्षञाच्या वेळी म्हणजे 7 ते 8 जून दरम्यान शेतकरी बाधंवानी खालील व्यवस्थापन करावे.

♦️ खत व्यवस्थापन :

( प्रमाण : प्रती झाड )

डी.ए.पी

250 ग्राम

ब्लॅक डायमंड

100 ग्राम

सुफर्ट

100 ग्राम

वरील खत व्यवस्थापन दोनदा म्हणजे 6 महिन्यात एकदा करावे. फवारणी प्रथम वर्षे प्रमाणेच पहिल्या दोन फवारण्या कराव्यात. हीच पद्धत लागवडी पासून पुढील 4 वर्षा पर्यंत ठेवावी.

आंतर पिके व आंतर मशागत

♦️मोसंबी लागवड केल्यानंतर आपण 5 व्या वर्षी बहार धरू शकतो. तो पर्यंत पहिले 4 वर्षे आपण खालील आंतरपिके घेऊ शकतो. 1 ते 4 वर्षे भुईमूंग व हरभरा - उन्हाळी भुईमूग व हिवाळी हरभरा घेता येईल किंवा पहिले 3 वर्षे लसूणघास घेता येईल किंवा भाजीवाल्यामध्ये लसूण, कांदा, मिरची, कोबी, टोमॅटो व तसेच फुलाची पिके झेंडू निशिगंध, शेवनती, मोगरा इ. घेता येतील पंरतू आंतरपिके घेताना मोसंबी पिकावर रोग व किडी वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

♦️ छाटणी:मोसंबी पिकाच्या झाडाला लहानपणा पासूनच छाटणी करून योग्य वळण दयावे. पंरतू नियमित छाटणी करण्याची गरज नाही. आवश्यकता असेल तेथेच छाटणी करावी म्हणजे पानकोब (वॉटरशूट), मर, रोगट भाग काढून टाकण्यापुरते छाटणी मर्यादीत असावी. छाटणीचे काम झाड सुप्त आवस्थेत असतानाच करावे व तेथे बोर्डोपेस्ट लावावा. खुंटावरील फुट वाढूनये यांची काळजी घ्यावी.

♦️ वळण देणे :झाडांना वळण देण्याचे काम लागवडी बरोबरच सुरु होते, झाडाचा विस्तार एकसारखा व्हावा तसेच खुंट मजबूत व्हावे कलमी खोडाचा जोड व्यवस्थित वाढ होणे, लागवडी नंतर कलमास भक्कम आधार देणे हि पहिली पायरी होय, खुंटावर फुट वाढू न देणे हि दुसरी पायरी होय, खुंटावर फुट येऊच नये या साठी बोर्डोपेस्टचा वापर करणे. खोडावरील सुप्त डोळ्यांची फुट थांबविण्यासाठी 5%तीव्रतेची पेस्ट लावावी.पावसाळया पूर्वी व पावसाळ्या नंतर असे दोनदा हि पेस्ट लावावे.

♦️बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी खालील प्रमाणे प्रमाण घ्यावे.

कॉपर सल्फेट

2 किलो

झिंक सल्फेट

2 किलो

चुना

2 किलो

पाणी

60 लिटर

फळ बहार नियोजन

♦️फळ बहार घेण्यापूर्वी झाडाला ताण बसणे आवश्यक असतें ताण व्यवस्थित बसत नसेल तर बहार धरण्याच्या 1 मिहिन्या अगोदर खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

संपदा

25 ग्राम

बोरॉन

30 ग्राम

0:52:34

100 ग्राम



आंबिया बहार व्यवस्थापन


♦️ खत व्यवस्थापन :

( प्रमाण : प्रती झाड )

निबोळी पेंड

500 ग्राम

ब्लॅक डायमंड

150 ग्राम

सुफर्ट

150 ग्राम

पोटॅश

200 ग्राम

18:46:0

500 ग्राम

वरील खत दिल्यानंतर वरील हलके पाणी देणे व 12 ते 15 दिवसात पहिली फवारणी करावी.

♦️ पहिली फवारणी :

( प्रमाण : प्रति 15 लिटर )

अविष्कार

7 मि.ली

बोरॉन

20 ग्राम

शक्तिमान गोल्ड

30 मि.ली

फायर 101

25 मि.ली

45 ते 60 दिवसात दुसरी फवारणी करावी. या वेळेस फुलगळ होण्याची शक्यता असते.

♦️ दुसरी फवारणी :

( प्रमाण : प्रति 15 लिटर )

फ्लॉवर किंग

1 मि.ली

बोरॉन

30 ग्राम

कॅल्शियम EDTA

15 ग्राम

तेजस

25 ग्राम

यानंतर फुलाचे रुपांतर गुंडी मध्ये होते. गुडी अवस्थेमध्ये पांढ़री माशी पिवळा कोळी, लाल कोळी, मावा, तुडतुडे इ. किटकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो या वेळेसमाईट शूट - 25 मीलीप्रती पंप आपल्या घटका सोबत घेऊन फवारणे.
मावा, तुडतुडे, व पांढरी माशी या करताव्हिजील - 8 ग्रामप्रती पंप तसेच थ्रीप्स मोठ्या प्रमाणावर आढळल्याससोनाटा 70 - 25 मि.लीप्रती पंप वापरावे.

जून- जुलै फळ फुगवण अवस्था


या वेळेस खालील प्रमाणे खताचा डोस

( प्रमाण : प्रती झाड )

पोटॅश

500 ग्राम

ब्लॅक डायमंड

200 ग्राम

सुफर्ट

200 ग्राम

त्यानंतर फळ फुगवणी साठी खालील फवारणी करावी

♦️ दुसरी फवारणी :

( प्रमाण : प्रति 15 लिटर )

अविष्कार

5 मि.ली

जिब्रॅक्स

30 मि.ली

बोरॉन

30 ग्राम

या वेळेस फळमाशी मोठ्या प्रमाणात आपल्या बागेमध्ये येत असते. अशा वेळेसफेन्डॉल - 25 मिलीकिंवामिओथ्रिज - 20 मिलीआपल्या फवारणी मधून घेता येईल. याच्या आपल्या पिकाला फार मोठा फायदा होतो.

♦️ टिप :फळमाशी करता एका प्लॉट मध्ये 6 ते 8 ठिकाणीमाक्षिकारी + नुआनकिंवाक्लोरोयादोन्ही घटकाचे वेगळे वेगळे बोळे तयार करून कागदाच्या प्लेट मध्ये ठेवावे यामुळे नर पतंगे आकृष्ट होऊन मरण पावतील व प्रजनन होणार नाही.

महत्वाचे रोग


♦️ डिंक्या :फुट रॉट, कॉलर रॉट ,गमोसीस या नावाने ओळखला जाणारा हा रोग फायटोपथेरा या बुरशी मुळे होतो. खोडावरील सालीतून डिंक पाझरणे, व खोडाची साल निकामी होणे हि या रोगाची लक्षणे आहेत.

प्रतिबंध व उपाय योजना



♦️रंगपूर लाईम या खुंटावर डोळा भरलेली कलमे लावावी.
♦️30 सें पेक्षा अधिक उंचीवर भरलेल्या डोळ्यांची कलमे निवडावीत.
♦️खोडास पाणी लागू देऊ नये.
♦️पावसाळ्या पूर्वी व पावसाळ्या नंतर 80 ते 100 सें मी उंची पर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.
♦️रोगट भाग चाकूने खरडून काढावा व तेथे पोटॅशियम परमॅगनेट ने धुवून काढावे.

♦️ मुळकुज :गनोडर्मा रुट रॉट असे हि म्हणतात. वरच्या थरातील मोठ्या मुळापासून सुरुवात होऊन खोल वरच्या मुळा व खोडाकडे पसरणारा हा रोग अतिशय घातक असतो.
उपाय योजना :स्कायगोल्ड, ब्लू कॉपरअथवाट्रायकोड्रमायाची ड्रिचिंग करावी.