ऊस

ऊस

Category

व्यावसायिक पिके

ऊस

ऊस पिक नियोजन

ऊस हे तृणवर्गीय पिक असून महाराष्ट्रात सर्वदूर घेतल्या जाते. मुख्यत्वे साखर व गुळ उत्पादनासाठी हे महत्वाचे पिक आहे. वार्षिक पिक असल्यामुळे प्रति एकरी उत्पादन 70 ते 100 मॅट्रिक टन आल्यास हमखास हे पिक घेण्यास परवडते. नवीन लागण व खोडवा अशा दोन पध्दतीत ऊस लागवड केल्या जाते. काळी कसदार जमिन असेल तरच उत्पादन भरघोस येते. चांगला सुर्यप्रकाश या पिकासाठी पोषक ठरतो. सुधारित तंत्रज्ञान व काटेकोर नियोजन केल्यास उत्पादन हमखास येते. 86:0:32, 671, 8014, 0265, 9805, 7219, 7125 (संपदा) असे अनेक वाण महाराष्ट्रात प्रचलित आहे.

♦️ जमिनीची मशागत :सखोल नांगरटीकरून कुळव्याच्या 2 ते 3 पाळ्या देवून जमिन भुसभुशीत करावी. 4.5 फुटाच्या अंतराने सऱ्या पाडुन घ्याव्यात कुजलेले व प्रक्रिया केलेले शेणखत असल्यास सरी पाडण्या अगोदर पसरवुन घ्यावे.

♦️ बेणे प्रक्रिया :प्रति एकरी 3 ते 3.5 टन बेण्याला खालील प्रमाणे प्रक्रिया करावे.

स्कायगोल्ड जेल

250 ग्राम

फायर 101

200 मि.ली

बावीस्टीन

200 ग्राम

♦️या तिनही घटकांचे द्रावण करून 100 लिटर पाणी तयार करावे व बेणे (टिपरे) या पाण्यातुन ढवळून काढावे. नंतर एक डोळा पध्दतीने लागवड करावी.

♦️ पहिली आळवणी ड्रिंचीग :लागवडीपासुन 7 ते 8 दिवसात आळवणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

100 ग्राम

ब्लु कॉपर

100 ग्राम

19:19:19

100 ग्राम

( ठिबक प्रती एकरी 200 लिटर )

स्कायगोल्ड जेल

1 किलो

ब्लु कॉपर

1 किलो

19:19:19

2 किलो

♦️ दुसरी आळवणी ड्रिंचीग :लागवडीपासुन 16 ते 20 दिवसात दुसरी ड्रिचींग करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

सुप्रिमो

200 मि.ली

मिरॅकल

100 मि.ली

( ठिबक प्रती एकरी 200 लिटर )

सुप्रिमो

2 लिटर

मिरॅकल

1 लिटर

या नंतर 2 ते 3 दिवसांनी खताची पहिली मात्रा द्यावी.

♦️ खताची पहिली मात्रा :

( प्रमाण : प्रति एकर )

डि.ए.पी

1 बॅग

एम.ओ.पी

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅकडायमंड

10 किलो

निंबोणी पेंड

1 बॅग

♦️ पहिली फवारणी :लागवडी पासुन 27 ते 28 दिवसात करावी, या फवारणीमुळे आपल्या पिकाला भरपुर फुटवे फुटतील व वाढ जोमाने होईल.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

एलीयट

20 ग्राम

फायर -101

25 मि.ली

♦️या फवारणी नंतर बरोबर 8 व्या दिवशी खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

चॅम्पियन

1 मिली

गोल्ड रूट टॅबलेट

1 गोळी

♦️ दुसरी फवारणी :लागवडीपासुन 38 ते 40 दिवसात दुसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

5 मिली

संपदा

25 ग्राम

नेटीओ

10 ग्राम

सोनाटा - 70

25 मि.ली


♦️ तिसरी फवारणी :लागवडी पासुन 50 ते 54 दिवसात तिसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

बलवान

5 मिली

जीब्रॅक्स

40 मीली


♦️ खताची दुसरी मात्रा :लागवडी पासून 65 ते 70 दिवसात दुसरी मात्रा टाकावी.

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

युरिया

1 बॅग

विघ्नहर्ता विकास किट

25 किलो

♦️ धुरळणी :80 ते 85 दिवसात पिकाच्या चारही बाजुने कडेकडेने फोलीडॉल पावडरची धुरळणी करावी.

♦️ खताचा तिसरी डोस :डोस लागवडीपासुन 90 ते 100 दिवसात टाकावा

( प्रमाण : प्रति एकर )

सुफर्ट

10 किलो

ब्लेक डायमंड

10 किलो

10 : 26 : 26

75 किलो

पोटॅश

50 किलो


♦️जर ठिंबक असेल तर खताचा डोस दिल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर विद्राव्य खत आळी पाळीने खालील प्रमाणे सोडावी.

पहिला दिवस

19 : 19 : 19

8 किलो

10 दिवसानंतर

12:61:0

8 किलो

10 दिवसानंतर

13:0:45

8 किलो

10 दिवसानंतर

00:00:50

8 किलो

♦️वरील प्रमाणे 10- 10 दिवसाच्या अंतराने प्रत्येक घटक तीनदा सोडावे. प्रत्येक घटक 24 किलो प्रति एकरी सोडावे.

♦️ ऊसावरील किडी व रोग :पांढरी माशी, लोकरी मावा, पिवळा मावा, हुमणी यांचा बंदोबस्त फवारण्यातील घटका मधून करण्याचा प्रयत्न केला आहे.