ज्वारी
Category
धान्य पिके
ज्वारी पिकाचे नियोजन
सुमारे पाच हजार वर्षांपासुन भारतात ज्वारीचे पिक घेतल्या जाते. खाण्यास रुचकर व पचण्यास हलके हे पिक महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात रोजच्या आहारात असते. उष्ण हवामानात येणारे हे पिक मराठवाडा, खान्देश व विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. मोतीचुर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी, हायब्रीड ज्वारी सुधारीत वाणात मालदांडी, सुधारित सावनेर, सातपाणी, टेसपुरी 296, 537 अशा विविध प्रकारचे वाण बाजारात उपलब्ध असतात.
मुख्यतः ज्वारीवर येणारे रोग: काणी, काजळी, तांबेरा, केवडा, अरगट आणि करपा हे कवक जन्य रोग पिकांना रोगग्रस्त करतात. ज्वारीचे पिक कोणत्याही जमिनीत येते. तरी जितकी चांगली जमिन तितके चांगले उत्पादन काढता येते.
♦️ जमिनीची मशागत :जमिनीची नांगरट केल्यास अति उत्तम, ज्वारी करिता नांगरुन व कुळवुन जमिन तयार करावी.
♦️ बिज प्रक्रिया :एकरी 5 किलो बियाणे घेणे :
स्कायगोल्ड जेल - 50 ग्राम + बावीस्टीन 50 ग्राम + मोरचुद- 20 ग्राम
यांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळू देणे.
♦️ पेरणी :दोन सरीमधील अंतर एक ते दीड फुटाचे ठेवावे. पेरणी सोबत खत :
(प्रमाण : प्रति एकर) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
♦️ ज्वारी या पिकावर येणारे किटक:वाळवी, उधई, वाणी, हुमणी, खोडमाशी, खोड किडा, मावा, तुडतुडे, लष्करी अळी, कणसातील अळी व माईट या सर्व शत्रु किटकांचा बंदोबस्त वेळेशीर करणे आवश्यक असते.
♦️ पहिली फवारणी :पेरणी पासुन 16 ते 20 दिवसांत खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
यु पी एल कंपनीचेसाफ | 20 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️पेरणी पासुन 35 ते 38 दिवसात युरिया - 30 किलो प्रति एकरी शिंपुन पाणी देणे व दुसरी फवारणी लगेच करणे.
♦️ दुसरी फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
अविष्कार | 5 मि.ली |
टिल्ट | 20 मी.ली |
सोनाटा 70 | 20 मि.ली |
♦️ तिसरी फवारणी :कणीस तयार होतांना तिसरी फवारणी घ्यावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
जीब्रॅक्स | 25 मि.ली |
संपदा | 25 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर दरम्यान करावी.
♦️ अधिक माहिती :शेतात उभी असलेली सरासरी एक ते दीड महिन्याची कोवळी ताटे जनावरांना खाऊ देवु नये. यातुन किरळ विष (ग्लुकोसाईड) जनावरांच्या पोटात गेल्यास विषबाधा होते. रब्बी 2019-20 व 2020- 21. 2021-22 व 2022-23 मध्ये माझ्या तंत्राने करणाऱ्या शेतकऱ्यांना एका बियाचे फुटवे 16 व ज्वारीच्या एक ताठाला 4 कणीस आल्याचे अनुभव आले.