चिकू
Category
फळबाग
चिकू उत्पादन तंत्रज्ञान
♦️मध्य अमेरीका व मेक्सिको हे चिकूचे मुळस्थान असून भारतात पहिल्या प्रथम महाराष्ट्रातील कोकण विभागात भोलवड या गावात चिकूची प्रथम लागवड व सुरुवात झाली. इ.स 1898 साली या परिसरात चिकूची पहिली कलमे लावण्यात आल्याची नोंद फळबागेच्या इतिहासात नोंद केलेली आहे. पुण्याच्या गणेश खिंड फळ संशोधन केंद्रवर सन 1936 साली चिकू बागेची लागवड झाली. या बागेतील सर्व झाडे आजही सुव्यवस्थित आहेत.
♦️ जमिन आणि हवामान :उष्ण कटिबंधात येणारे हे पिंक उष्ण आणि दमट हवामानात चांगले उत्पादन देते. सरासरी वार्षिक 125 ते 250 सेंमी पाऊस पडणाऱ्या भागातही चिकूची झाडे उत्तम वाढतात. कडाक्याची थंडी, धुके, गारा इ. मात्र चिकूस सोसवत नाही. 8 सें पेक्षा कमी तापमान गेल्यास किंवा 39° से या मर्यादेपलिकडे तापमान गेल्यास चिकूच्या फळधारणेवर व फळ वाढीवर विपरीत परिणाम होतो.
♦️उत्तम निचरा होणारी व सेंद्रिय पदार्थयुक्त असलेली जमिन या फळ झाडास चांगली मानवते. उथळ, बरड, खडकाळ, तसेच क्षारयुक्त चुनखडीची आणि पाणी साचून राहणारी जमिन या पिकास चालत नाही. जमिनीत एक मीटरच्या खाली कठीण मुरूम अथवा खडक असला तरीही दहा बारा वर्षा नंतर झाडे उबळव्यास सुरुवात होते. पुढील तीन चार वर्षात झाडे वाळून ( मर ) जातात.
♦️ जात निवड :चिकू मध्ये मुख्यतः 3 प्रमुख जाती आहेत :
♦️ 1. काळीपत्ती :महाराष्ट्रातील बऱ्याश्या भागात हिच प्रमुख जात म्हणून लागवड केली जाते. झाडाची डौलदार आकार, फळे मोठ्या आकाराची उत्पादन क्षमता भरपूर व चवदार फळे हि वैशिष्ट असलेली काळीपत्ती हि जात असून झाड उंच आणि डेरेदार वाढते. पानाचा रंग गर्द हिरवा असतो. फळे मोठी व अंडाकृती वाढतात. फळमध्ये एक ते दोन चकत्या बिया असतात.
♦️ 2. छत्री :या जातीच्या झाडाचा आकार छत्री सारखा दिसतो म्हणूनच याला छत्री नाव पडले आहे. पानाचा रंग पोपटी असून पाने मोठी व अंडाकृती असतात. या जातीची फळे मोठी व अंडाकृती असून काळीपत्ती च्या फळासारखेच दिसतात मात्र चविस कमी दर्जाची असतात. फळामध्ये दोन बिया असतात. काही भागात पोपटी रंगाच्या पानावरून यांचे नाव पिलीपत्ती असे सुध्दा म्हटल्या जाते
♦️ 3. क्रिकेटबॉल :या जातीस कलकत्ता लार्ज या नावानेही ओळखले जाते. परंतू ही जात महाराष्ट्रात सहसा कोणीही लागवड करत नाही.
♦️या तीन प्रमुख जाती शिवाय ढोलादिवानी, भुरीपत्ती, जिंजर, द्वारपुडी बारामासी अश्या अजूनही अनेक जाती आहेत. पंरतू हवामान आणि जमिन यांचा सारासार विचार करता महाराष्ट्रासाठी कालीपत्ती ही जातच योग्य आहे.
♦️ जमिनीची मशागत :जमिनीची आडवी उभी नांगरट करून व कुळव्याच्या तीन ते चार पाळ्या देवून जमिन भुसभूशीत करावी व जमिनी चे सपाटीकरण करून घ्यावे.
♦️ लागवड अंतर :रोप लागवड करण्यासाठी बांधापासून 5 मीटर अंतर सोडूनच 10 x 10 मीटरचे वर 1 x 1 x 1 मीटरचे खड्डे करावे व खालील प्रमाणे त्यात खत व्यस्थापन करावे.
प्रथम वर्षे नियोजन
♦️ खत व्यवस्थापन :
( प्रमाण : प्रति रोप ) | |
|---|---|
प्रक्रियायुक्त शेणखत | 3 किलो |
पोटॅश | 300 ग्राम |
सुफर्ट | 200 ग्राम |
ब्लॅकडायमंड | 200 ग्राम |
युरीया | 300 ग्राम |
सुपर फॉस्फेट | 1 किलो |
या घटकाचे मिश्रण करून खडे भरावे. व मधोमध रोप लावावे. लागवडीपासून 8 ते 12 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी करावी.
♦️ पहिली फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
वीगो | 25 ग्राम |
♦️ पहिली आळवणी :लागवडी पासुन 21 ते 24 दिवसात पहिली आळवणी करावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1.5 किलो |
ब्लूकॉपर | 500 ग्राम |
19 : 19 : 19 | 3 किलो |
टिप
♦️वरील पद्धतीचे नियोजन 3 वर्षापर्यंत याच पद्धतीने करावे. 4 थ्या व 5 व्या वर्षी हे प्रमाण दीड पट वाढवावे.
♦️6 व्या वर्षी बहार धरण्यापूर्वी झाडांना आकारयेईल. यापध्दतीने हलकी छाटणी करावी. व वाळलेल्या काड्या काढून घ्याव्यात.
बहार नियोजन
♦️सर्वात आधी हवामानानुसार आपल्याला मृगबहार की अंबिया बहार घेणे योग्य राहील. यांचा अभ्यास करावा व त्यापद्धतीने नियोजन करावे.
♦️ पहिली खताची मात्रा :
( प्रमाण प्रति झाड ) | |
|---|---|
शेणखत | 10 किलो |
सुफर्ट | 400 ग्राम |
युरिया | 700 ग्राम |
ब्लॅक डायमंड | 400 ग्राम |
सुपर फॉस्फेट | 1 किलो |
पोटॅश | 900 ग्राम |
♦️खत दिल्यानंतर लगेच पाणी देणे. हिवाळ्यात पाणी दिवसाच्या अंतराने देणे व उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसाच्या अंतराने पाणी देणे.
फूलधारणा
चिकूस पहिल्या वर्षा पासूनच फूल येतात तथापी पहिल्या वर्षी झाडाचा विस्तार लहान असतो. त्यामुळे फळे राखणे व उत्पादन घेणे हे अयोग्य ठरते म्हणून पहिली चार वर्ष फुले काढून टाकणेच योग्य ठरते व फुले काढून टाकल्यामूळे शेंडा वाढीस चालना मिळते व झाड वाढीच्या पूर्णत्वास पोहचते. वयाच्या सहा वर्षापासून फुले राखल्यास् अती उत्तम ठरते. वयाच्या सातव्या वर्षापासून उपादन घेणे योग्य आहे. फूल धारणा करताना खालील फवारणी अतीशय चांगल्या पद्धतीने भिज पद्धतीने करावी.
♦️ पहिली फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 8 मि.ली |
शक्तीमान गोल्ड | 30 मि.ली |
वीगो | 25 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️ पहिली फवारणीकरताना खाली ओल असणे गरजेचे आहे. यानंतर 15 ते 20 दिवसांत झाडावर मोठ्या प्रमाणात फुलाची संख्या दिसून येईल. यानंतर आपल्या बागेमध्ये मात्रा किंवा तुडतुडे दिसतात का यांचे निरीक्षण करावे व खालील फवारणी घ्यावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
रोको | 20 ग्राम |
माईटशूट | 25 मिली |
♦️यानंतर फळ बोराच्या आकाराचे झाल्यावर फवारणी करावी खालील प्रमाणे, त्या आधी आपल्या बागेत लाल कोळी दिसतात का यांचे निरीक्षण करावे.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
बलवान | 25 मिली |
जीब्रॅक्स | 40 मिली |
फोटॉन | 7 मिली |
♦️लाल कोळी दिसून आल्यास याच फवारणी मध्ये इथिओन किंग डायकोफॉल - 30 मिली प्रती पंप वापरावे. किंवा बोर्निव्हो - 15 मिली किंवा ओमाइंट - 25 मिली घ्यावे.
♦️जर लाल कोळी नसेल परंतु थ्रिप्स असतील तर मार्शल हा घटक प्रति पंप 25 मिली वापरावे. जर पांढरी माशी मोठ्या प्रमाणात दिसत असल्यास माईटशूट - 25 मिली प्रति पंप वापरावे.
♦️यानंतर फळाचा आकार पोसणे, चकाकी येणे, वजन वाढणे याकरीता ठिबकद्वारे खालील प्रमाणे घटक सोडावे.
♦️वरील पद्धतीने घटक सोडल्यानंतर फळाची वाढ चांगल्या प्रकारे होईल.
♦️ टिप :जर पिकाची मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असेल तरबोरॉन - 30 ग्रामवप्लॅनोफिक्स - 5 मि.लीप्रती पंप कोणत्याही फवारणी मध्ये वापरावे.
♦️ महत्वाची सूचना :फुल निघणे आणि फुल उमलणे या काळात संध्याकाळी 4 वाजेपासून हवेच्या माध्यमातून परागीकरण चालू असते. म्हणून संध्याकाळच्या वेळेस कोणत्याही प्रकारची आपल्या बागेत फवारणी करू नये अथवा आपल्या बागेत धूर करू नये.
चिकूवर येणारे रोग व किडी व त्यांचे नियंत्रण
♦️ पानावरील ठिपके :हा रोग बुरशीजन्य आहे. या रोगामुळे चिकूच्या पानावर गुलाबी - तपकिरी रंगाचे लहान ठिपके पडतात. या ठिपक्याचा मध्यभाग पांढरवट रंगाचा असतो, अश्या वेळेस
वीगो - 25 ग्राम (प्रति पंप)
फवारनी मध्ये घेणे या शिवाय कोळशी, खोडकिडा, साल खाणारी अळी, खवले किड, पानावरील अळी, सिफमायनर, पिढेकिडे, फळ पोखर किड, पर्णगुच्छ इ. रोगांचा प्रादुर्भाव असतो.