पपई

पपई

Category

फळबाग

पपई

पपई तंत्र

♦️ हवामान :पपई या पिका करिता उष्ण व समशितोष्ण हे हवामान उत्तम ठरते. 25 ते 38 तापमान या पिका करता चांगले असते. दव, धुके व धुवारी यामुळे पपईला फार मोठी हानी पोहचते. जोरात वाहणारे वारे वादळ, गारपिट यामुळे पपई या पिकाचे व फळाचे फार मोठे नुकसान होते. 18 अंश पेक्षा कमी तापमान झाल्यास फळाचा आकार उत्पादन व गोडी यावर फार मोठा परिणाम होत असतो अतिवृष्टी किंवा अतिशय जास्त पाऊस झाल्यास फूट रॉट, स्टेम रॉट, रूट रॉट, कॉलर रॉट हे रोग होण्याचा संभव असतो. पपई या पिका पासून जॅम व कच्या फळापासून टुटीफ्रुटी तयार करतात. सौंदर्य वाढविण्या करता पपई खाने तसेच पपईच्या गराचा लेप चेहर्‍यावर लावने उत्तम ठरते.

♦️ जात निवड :महाराष्ट्रात मुख्यत: तैवान 785, तैवान 786, ग्रीन बेरी, वॉशिंग्टन, कोइम्बतुर, आईस बेरी या जाती प्रचलीत आहे.

♦️ जमिनीची मशागत :जमिन खोल उभी-आडवी नांगरुण कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या घालून सपाट करून घ्यावी. कचरा वेचून जमिन स्वच्छ करावी. शेवटच्या पाळीच्या अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग व जय संजीवनी 5 किलो यांचे मिश्रण शिंपून शेवटची पाळी करावी.

♦️ लागवड अंतर :8 x 6 किंवा 6 x 5 हे व्हेराइटी प्रमाणे अंतर घ्यावे. 2 x 2 x 2 फूट या आकाराचे खड्डे करून घ्यावे. या प्रत्येक खड्ड्यात

एस.एस.पी

100 ग्राम

प्रक्रिया केलेले शेणखत व माती

200 ग्राम

ब्लक डायमंड

100 ग्राम

सुफर्ट

100 ग्राम

वरील प्रमाण घेवून प्रत्येक खड्यामध्ये हे खत भरावे व यामध्ये मधोमध लागवड करावी.

♦️ लागवड कालावधी :पपई या पिका करिता महाराष्ट्रात लागवडीचा कालावधी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी हा योग्य समजला जातो. तरी पण नोव्हेंबर मध्ये केलेली लागवड अतिशय चांगली.

♦️ पहिली आळवणी :लागवडी पासून 16 ते 20 दिवसाच्या दरम्यान पहिली अळवणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

100 ग्राम

ब्ल्युकॉपर

100 ग्राम

19:19:19

100 ग्राम

( ठिबक द्वारे प्रमाण : प्रति एकर )

स्कायगोल्ड जेल

1 किलो

ब्ल्युकॉपर

1 किलो

19:19:19

2 किलो


♦️ दुसरी आळवणी :लागवडी पासून 32 ते 35 दिवसात करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

सुप्रीमो

200 मिली

मिरकल

100 मिली

( ठिबक द्वारे प्रमाण : प्रति एकर )

सुप्रीमो

2 लिटर

मिरकल

1 लिटर

♦️या नंतर झाडांच्या खोडाना जमिनीपासून 40 से मी. पर्यंत बोर्डोपेस्ट लावावी.

♦️ तण नियंत्रण :तणनाशक वापरावयाचे असल्यास झाड जमिनीपासून 70 ते 90 से मी उंच झाल्यावर ग्रामोक्झोन यासारखे स्पर्शजन्य तणनाशक 200 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात मिसळून झाडाच्या कोणत्याही भागावर उडणार नाही याची दक्षता घेवूनच फक्त तणावर फवारणी करावी. वाटल्यास साधे नोझल न वापरता डब्लू-एफ-एन-62 नोझल वापरावा. पपईच्या झाडावरील वाळलेली पाने वरचे वर काढून ती खताच्या गड्यात टाकावी. प्रत्येक दीड महिन्यानी पपईच्या आळ्याची चाळणी करावी. म्हणजे झाडाच्या मुळाशी मोकळी हवा खेळत राहते. व त्यामुळे झाडाची व फळाची वाढ झपाट्याने होते.

♦️ तण नियंत्रण :पहिली फवारणी - 45 ते 50 दिवसात पहिली फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

रोको

20 ग्राम

माईट-शूट

25 मि.ली

♦️ दुसरी फवारणी :50 ते 100 दिवसात करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

सोनाटा

25 मी.ली


♦️पपई बहार नियोजन करते वेळेस 12:61:03 किलो प्रति एकरी सोडावे.♦️फळ धारणा होतांना 160 ते 170 दिवसात तिसरी फवारणी करावी.

♦️ तिसरी फवारणी :

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

5 मि.ली

शक्तीमानगोल्ड

25 मि.ली

रोको

20 ग्राम

फायर 101

25 मि.ली

♦️या फवारणी नंतर भरघोस प्रमाणात फूल उत्पत्ती होते परंतू वातावरणाचा असमतोलपणा झाल्यास धुके धूवारी पडल्यास, ढगाळ वातावरण तयार झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते.

♦️अश्या वेळेस खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

बोरॉन

30 ग्राम

कॅल्शियम नाईटरेट

75 ग्राम

व्हिजील

8 मिली

अवतार (इंडोफिल कंपनी)

25 ग्राम


♦️लागवडी घासून 230 ते 270 दिवसात खराब झालेले व पिवळे झालेले पाने काढून हवा खेळती ठेवावी व खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

संजीवनी

40 मिली

जीब्रॅक्स

40 मिली

गो मोजक

15 मिली


♦️फळावर पांढरे तांबडे बारीक चट्टे दिसत असल्यास माईट-शूट - 25 मिली आपल्या फवारणी मध्ये घेणे, यानंतर फळ फुगवण अवस्था येते. त्यावेळेस ठिबक द्वारे

( प्रमाण : प्रति एकर )

0 : 52 : 34

4 किलो

जीब्रॅक्स

2 लिटर

सुप्रीमो

2 लिटर

झाडावर मिलीबग (पिठ्या ढेकून), आढळून आल्यासनिरमा 2 चमचे, शॉम्पू 2 पूडीप्रति पंप फवारणे व त्यानंतर 1 तासानेफायर - 101 - 25 मिलीकिंवामाईटशूट - 25 मीलीप्रति पंप फवारणी करणे. पिकाला12:61:0, 13:40:13 व 0:0:50प्रति एकरी 8 किलोची मात्रा आलटून पालटून देणे.