कांदा

कांदा

Category

कंद पिके

कांदा

कांदा पिक नियोजन

शहरी व ग्रामीण भागात रोजच्या आहारात कांदा पिकाचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कांदा व लसुण नसले तर कोणत्याच भाजीला चव नसते. महाराष्ट्रात कांदयाचे पिक सर्वदूर घेतल्या जाते. विभाग व हवामानानुसार तिनही हंगामा मध्ये कांदयाचे पिक घेतल्या जाते. महाराष्ट्रात 150 क्विंटल ते 200 क्विंटल प्रति एकरी उत्पादन देणारे हे पिक आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश व कमी तापमान या पिका करिता अनुकूल असते. पाण्याचा निचरा होणारी भारी जमिन किंवा मध्यम जमिन भुसभुशीत असलेली अशा जमिनीत पिक उत्तम येते. चोपन जमिन किंवा खारवट जमिनीमध्ये रोपे वाढत नाही व कांदा पोसत नाही. पाण्याचा निचरा योग्य न झाल्यास रोगांचे प्रमाणे वाढते.

♦️ बियाणे निवड :महाराष्ट्रातील बहुतांश भागात गर्द लाल रंगाचा व काही भागात पांढऱ्या रंगाच्या कांदयाची लागवड होते. पुसा सरदार, पुसा माधवी, पुसा रेड हे रब्बीसाठी तर खरीपासाठी एन-53, बसवंत 780 यापैकी अथवा बाजारात उपलब्ध असलेले चांगल्या पैकी बियाणे निवडावे. पांढऱ्या कांदयामध्ये पुसा व्हाईट राऊंड, पुसा व्हाईट प्ले यापैकी निवड करावी. कांदा पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी निरोगी व सशक्त रोपे तयार करावी. कांदयाचे बी अत्यंत हलके व आकाराने अतिशय लहान असल्यामुळे हवेने उडू शकतात. किंवा पाण्याने वाहुन जाऊ शकतात त्यामुळे शिंपणे किंवा पेरणे हे चुकीचे ठरते. तरीपण बरेचशे शेतकरी शिंपणे किंवा पेरणे करतातच माझा याला मुळीच विरोध नाही. बियाणे चांगल्या कंपनीचे दुकानातूनच पक्के बीलासह खरेदी करावे. रोप तयार करतांना गादी वाफ्यावर तयार केलेले रोप सर्वात उत्तम असते, कारण या रोपांची वाढ एकसारखी झालेली असते. 5 मीटर लांब व 1 मीटर रुंद असे गादी वाफे तयार करावे. व त्यात ओळी आखून बियाण्यांची पेरणी करावी कंपोस्ट खत टाकुन तयार केलेले वाफे अधिक उत्तम असतात.

♦️ बिज प्रक्रिया :प्रति एकरी 2.5 किलो (अडीच किलो) बियाणे घेवून त्यास बिजप्रक्रीया करावी.

स्कायगोल्ड जेल - 50 ग्राम व बावीस्टीन-50 ग्राम

कालवुन बिज प्रक्रिया करावी व बियाणे वाळवुन घ्यावे. वाफ्यामध्ये रोप टाकलेले असल्यास कमी प्रवाहाने पाणी सोडावे किंवा वाफ्याचा तोंडावर गवताची पेंडी अथवा तुराट्यांची चुबळ ठेवावी. म्हणजे पाण्याचा जोर कमी होईल. रोप तयार होतांना प्रति 15 लिटर पंपानी खालील फवारणी दोन वेळेस करावी.

स्कायगोल्ड जेल

30 ग्राम

वीगो

25 ग्राम


♦️ जमिनीची मशागत :जमिनीची आडवी उभी नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या करून शेत भुसभुशीत करून घ्यावे. जमिनीचा उतारा पाहून सपाट वाफे तयार करावे. वाफे तयार करण्यापूर्वी 2 x 6 किंवा 1.5 x 3 वाफे तयार करून घ्यावे. किंवा सरी पध्दतीने वरंबे असलेले वाफे तयार करावे. लागवड 4 x 6 अंतराने करावी. व रब्बी मध्ये हे अंतर 4 x 4 ठेवावे. पेरणी अथवा लागवड सोबतच खते द्यावे.

( प्रमाण : प्रति एकर )

डि.ए.पी

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

युरीया

25 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो

आठ दिवसानंतर आंबवणी हलके पाणी द्यावे.

♦️ तणनाशके :खुरपनीचा खर्च अधिक होत असल्यामुळे पैशांची बचत करण्याच्या हेतुने शेतकरी तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परंतु जर लागवडीपूर्वी तणनाशक मारल्यास किंवा ओली लागवड करावयाची असल्यास लागवडीनंतर 21 दिवसाच्या आतगोल 15 मि.ली + टर्गासुपर 20 मि.लीप्रति पंप फवारून घेणे या नंतर पाचव्या दिवशीकॅप्टन 30 मि.लीप्रती पंपाने फवारणी करून घ्यावी व नंतर 8 ते 10 दिवसात12:32:16 - 2 बॅगसल्फर - 10 किलोप्रति एकरी शिंपुन पाणी सोडावे व वाफसा झाल्यावर फवारणी करावी.

♦️ पहिली फवारणी :

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

टील्ट

20 मि.ली

संपदा

25 ग्राम

फायर 101

25 मि.ली


♦️ दुसरी फवारणी :लागवडीपासुन 45 ते 50 दिवसा दरम्यान करावी

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

अविष्कार

5 मि.ली

सोनाटा-70

25 मि.ली

♦️जर करपा लागत असल्यासकेव्हीएट - 15 ग्रामप्रति पंप फवारणीमध्ये घेणे वरील फवारणी नंतर 8 ते 10 दिवसात10:26:26 - 1 बॅग, पोटॅश - 25 किलोविघ्नहर्ता विकास किट- 25 किलोप्रति एकरी शिंपुन पाणी सोडावे व दोन दिवसात खालील फवारणी करावी. गावरान गाईचे ताजेगोमुत्र - 50 मि.लीफायर 101 - 25 मि.लीप्रति 15 लिटर पंपाने फवारणी.

♦️ शेवटची फवारणी :कांदा पोसत असतांना शेवटची फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

बलवान

25 मि.ली

डेसिस 100

15 मि.ली

ॲमेस्टार

15 ग्राम


♦️या फवारणीमध्ये कंद् माशीच्या अळीने कांदा गड्याचे होणारे नुकसान टाळता येते. जर कांदा गड्ड्याची पुरेशी वाढ होत नसेल तर,स्कायगोल्ड जेल - 25 ग्रामजीब्रॅक्स - 30 मि.ली.प्रति 15 लिटर पंपाने फवारणे म्हणजे याची वाढ जोमाने होते.

♦️कांदा पिकावरील मुख्य रोग : मुळ कुजव्या, जांभळे डाग, करपा, भुरी, काजळी, या सर्वा करिता फवारण्यांमध्ये आवश्यक घटक घेतलेले आहे.