भेंडी
Category
फळभाज्या
भेंडी तंत्र
♦️मीत्रांनो बरेच दिवसापासून आपण भेंडी तंत्राची मागणी करीत आहात. आज आपणास भेंडीतंत्र देतांना मला आनंद होत आहे. साधारण पणे 6 ते 9 से.मी. लांबी असलेल्या भेंडीला चांगली मागणी असते. याकरीता सूधारीत जातीची नीवड करणे गरजेचे असते.
♦️अर्का अनामीका या जातीची भेंडी लांब असून कोवळी असते व यावर यलोव्हेन मोजँक हळद्या-केवडा या रोगाचा प्रादुर्भाव राहात नाही. 120 दिवसात 120 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले पाहिजे.
♦️परभणी क्रांती या जातीची भेंडी कोवळी व लांब असते 50-60 दिवसात पहिला तोडा देणारी जात आहे. याला सूध्दा 120-150 क्विंटल पर्यंत प्रती हेक्टरी ऊतारा घेवू शकतो.
♦️फुले कीर्ती, वर्षा उपहार या जाती सूध्दा चांगल्याप्रकारे उत्पादन देतात याशीवाय सीड कंपण्यांनी हंगामानुसार जास्त ऊत्पादन देणारे संकरीत वाण विकसीत केलेले आहे. यापैकी वाणाची नीवड करावी.
♦️ हवामान :20 ते 40 डि. सेंग्रे. मध्ये या पीकाची चांगली वाढ होते. कमी तापमान असल्यास ऊगवन शक्ती कमी होण्याची शक्यता असते व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
♦️ बीयाणे :गरम पाण्यात बुडवून स्कायगोल्ड जेल -50 ग्राम व बावीस्टीन-50 ग्राम ची बीज प्रक्रिया केल्यास ऊगवन चांगल्याप्रकारे होते.
♦️ मशागत :60 से.मी रूंद 30 से.मी.ऊंच तसेच दोन गादीवाफ्यामध्ये 40 से.मी.अंतर ठेवून वाफे तयार करावेत. एकरी किमान 4 किलो बीयाणे वापरावे. लागवड सरी-वरंबा पध्दतीने करता येईल परंतू गादीवाफ्यामध्ये ऊत्पादन जास्त येते. जीब्रॅक्स -50 मी.ली.व पाणी 100 मी.ली. मध्ये 24 तास बीयाणे भीजत ठेवल्यास फायदा मीळेल.
♦️फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत लागवड करता येईल. दोन बिया टोकणे आवश्यक आहे.
♦️ पहिली आळवणी :12-16 दिवसात ड्रिंचीग करणे
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
ब्ल्यूकाँपर | 50 ग्राम |
19:19:19 | 100 ग्राम |
♦️ पहिला खताचा डोस :18-20 दिवसात पहिला खताचा डोस द्यावा :
(प्रमाण : प्रति एकर) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
पोटॅश | 25 किलो |
♦️ दुसरा खताचा डोस :35-45 दिवसात दुसरा खताचा डोस द्यावा.
(प्रमाण : प्रति एकर) | |
|---|---|
10:26:26 | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
यूरीया | 25 किलो |
70-80 दिवसात. परत एक 10:26:26 बँग देणे.
♦️ पहिली फवारणी :20-24 दिवसात पहिली फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
फायर-101 | 20 मी.ली |
व्हिजील | 8 ग्राम |
♦️ दुसरी फवारणी :दुसरी फवारणी 36-40 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तिमान गोल्ड | 25 मी.ली |
फायर 101 | 25 मि.ली |
एंट्राँकाल | 20 ग्राम |
♦️ तिसरी फवारणी :तिसरी फवारणी 50-60 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
सोनाटा-70 | 25 मि.ली |
♦️ चौथी फवारणी :चौथी फवारणी परत एकदा 80-90 दिवसात.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तिमान गोल्ड | 25 मी.ली |
प्रोक्लेम | 10 ग्राम |
♦️या फवारण्यामध्ये तुडतूडे, हळद्या, भुरी, ठिपक्यांची बोंड आळी यावर नीयंत्रण घेण्यासाठी प्रयत्न केले आहे.या पेक्षा काही अडचण आली तर ग्रुपवर वीचारणा करावी.
♦️ टीप :मर लागत असल्यासभु-धन - 100 मि.लीप्रति पंपाने आळवणी करावी.