आंबा

आंबा

Category

फळबाग

आंबा

आंबा उत्पादन तंत्रज्ञान

महाराष्ट्रात गावराण आंबे फळाचा लोप पावत चालला आहे. फळाचा राजा आंबा विदर्भ व मराठवाडा या विभागात अतिशय कमी प्रमाणात होत असताना आता मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आंबा पिकाच्या लागवडीकडे वळत आहे.

♦️ जात निवड :हापूस, केशर, पायरी, लंगडा, दशेरी, देवगड, कोकण सम्राट, कोकण राजा, सिंधू व वणराज अशा अनेक संकरीत व संशोधित जाती या पिकामध्ये उपलब्ध आहेत. बाजारात कोणतीही जात असो पण या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

♦️ जमिनीची मशागत :लागवड करण्यापूर्वी उभी व आङ्वी सखोल नांगरट करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या काराव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी खालील खत प्रति एकरी शिंपून शेवटची पाळी करावी.

सिंगल सुपर फॉस्फेट

1 बॅग

जय संजीवनी

5 किलो


♦️ लागवड अंतर :आपली भारी जमिन असल्यास 10x10 मीटर व हलक्या व मध्यम जमिनी करता 9 x 9 मीटर अंतर योग्य ठरते. 0.5 x 0.5 x 0.5 मी या आकाराचे खड्डे करून घ्यावे.

या खड्यामध्ये शेणखत प्रक्रिया केलेले

2 किलो

सिंगल सुपर फॉस्फेट

1 किलो

ब्लॅकडायमंड

200 ग्राम

सुफर्ट

200 ग्राम

या सर्वांचे मिश्रण करून खड्डे भरावे

♦️ टिप :जमिनीची निवड करताना पाण्याचा निचरा होणारी जमिन निवडावी. चुनखडीयुक्त किंवा मुरूम असलेल्या त्या जमिनीत लागवड करु नये. जात निवड करताना आपल्या भागातील हवामान व वातावरण कोणत्या जातीला उपयुक्त ठरेल यांचा अभ्यास करूनच जातीची निवड करावी.

प्रथम वर्षे नियोजन

♦️लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी 1 ली ड्रिंचिग आळवणी ठिबक द्वारे घटक सोडावे.

( प्रमाण : प्रति एकर )

स्कायगोल्ड जेल

1 किलो

ब्लूकॉपर

500 ग्राम

19 : 19 : 19

2 किलो

फायर 101

25 मि.ली


♦️लागवडीनंतर 35 ते 40 दिवसाने पहिली फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मिली

वीगो

25 ग्राम


♦️ दुसरी फवारणी:90 ते 100 दिवसात दुसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

30 ग्राम

संपदा

30 ग्राम

फायर 101

25 मिली


♦️ टीप :याप्रकारे वरील पद्धतीने खताच्या मात्रा व फवारण्या 3 वर्षा पर्यंत कराव्यात व नंतर बहार येण्या अगोदर पुढील प्रमाणे नियोजन करावे.

♦️ खत व्यवस्थापन :

( प्रमाण प्रति झाड )

शेणखत

10 किलो

D.A.P

1 किलो

पोटॅश

700 ग्राम

ब्लॅक डायमंड

500 ग्राम

सुफर्ट

500 ग्राम


♦️डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात आंबा पिकास मोहर येण्यास सुरुवात होते. त्या अगोदर 1 महिना अगोदर पॅक्लो ब्युट्रोझोल या घटकाची 4 मिली प्रति पंप फवारणी करावी. (हा घटक आपल्या घटकासोबत सुद्धा फवारता येतो.)

♦️बहार चालू झाल्या बरोबर खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

8 मिली

शक्तिमान

30 मिली

फायर 101

25 मिली

बोरॉन

30 ग्राम


♦️ तिसरी फवारणी :फळाचा आकार बोरा इतका झाल्यानंतर पुढील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

बोरॉन

30 ग्राम

प्लॅनोफिक्स

5 मि.ली


♦️ टिप :धुके, धुवारी, ढगाळ वातावरण असल्यास बहारगळ, फळगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अशा वेळेस खालील प्रमाणे फवारणी करावी.

बलवान

25 मिली

कॅब्रीओटॉप

30 ग्राम


♦️बहाराचा गोंडा बनूण काळे पडत असल्यास अश्या वेळेस

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

सुपर प्लस

40 मिली

ॲमेस्टार

15 ग्राम

बोरॉन

30 ग्राम


♦️ फवारणी :फळाचा आकार लिंबू सारखा झाल्यानंतर आकार वाढवणे, फळाला चकाकी आणणे व गर भरणे याकरता खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

8 मिली

जिब्रॅक्स

30 मिली

माईट-शूट

25 मिली


♦️ टिप :कैरी तयार झाल्यानंतर इजळणे किंवा काळी पडणे असा प्रकार होत असल्यास. ही फवारणी करावी

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

बोरॉन

25 ग्राम

हारू / कर्झेट

25 ग्राम


♦️ टिप :फळमाशी, मीजमाशी, तुडतुड़े दिसल्यास खालील प्रमाणे फवारणी केल्यास फळमाशी, मीजमाशीचा बदोबस्त होतो.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

कराटे

25 मिली

सोनाटा 70

25 मिली

स्कायगोल्ड

30 ग्राम

♦️ टिप :खोडकिडा, वाळवी, उधई, डिक्या, पर्णगुच्छ, भुंगा असा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणीमध्ये

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

फायर 101

25 मिली

क्लोरो 20%

30 मिली


♦️ टिप :जर आळवणी करावयाची असल्यास खालील घटकाची करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

क्लोरो 50%

100 मिली

स्कायगोल्ड जेल

100 ग्राम

ब्लूकॉपर

50 ग्राम


♦️ आंब्याच्या कोयी वरील किडा :या किडीची अळी आणि सोंड्या पिकलेल्या आंब्यावरील गुर खातात. अश्या वेळेसमाईट-शूट - 25 मिलीप्रति 15 लिटर ने फवारणी करावी. या शिवाय पिठ्याढेकूण, मोहर पोखरणारी अळी, फुलकिड कोळी, भूरी किंवा टाक्या रोग, शेंडामर, मुळकूजव्या, रोपमर ,फांदिमर इ. किंडी त्रासदायक ठरतात. परंतू आपल्या फवारण्यामध्ये आपल्या नियोजनात याचा बंदोबस्त केला आहे.