मक्का

मक्का

Category

धान्य पिके

मक्का

मक्का पिकाचे नियोजन

मक्का हे उष्ण समशीतोष्ण व थंड हवामानाशी समरस होणारे पिक आहे. बहुविध उपयोग असलेले हे पिकाला प्लास्टीक धागे, गुरांचा पौष्टीक आहार अशा विविध उपयोगात येते. धुके (धुई, धुवारी) या पिकास घातक ठरते. 22 ते 30 अंश तापमान या पिकाला अनुकूल असते.

♦️ जमिनीची मशागत :सखोल नांगरणी करून कुळवाच्या दोन पाळ्या देवून जमिन भुसभुशीत करून घ्यावी. आपल्या तंत्राने तयार केलेले शेणखत असल्यास 3 ते 4 टन प्रति एकरी जमिनीत मिसळावे.

♦️ बिज प्रक्रिया :आपल्या आवडीनुसार बियाणे निवडावे जसे पायोनियर पी - 3401, पी - 3501, 9133, 6240 पिनॅकॉल कोरडवाहू करीता तसेच हलक्या व मध्यम जमिनीसाठी पी 3302, 9933, 6240 हे वाण भरीव उत्पादन देणारे दिसुन आले. प्रति एकरी 8 किलो बियाणे घेणे.

स्कायगोल्ड जेल - 100 ग्राम + बावीस्टीन 100 ग्राम


यांचे द्रावणात बिजप्रक्रिया करून बियाणे वाळवुन घेणे.

♦️ लागवड :दोन सरीमधील अंतर दोन फुट व दोन बिया मधील अंतर 9 ते 10 इंच ठेवावे व बियाची 1 ते 3 इंच टोकण करावी. मक्का हे पिक खादाड पीक म्हणून संबोधल्या जाते.

पेरणी सोबतच खत (प्रमाण : प्रति एकर)

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो

पोटॅश

25 किलो

झिंक सल्फेट

8 किलो

या सर्व खताचे मिश्रण जमिनीत मिसळावे. मक्का उगवणीनंतर आठ दिवसांनी दाट झाले असल्यास विरळणी करावी.

♦️ पहिली फवारणी :लागवडी पासुन 22 ते 24 दिवसात फवारणी करावी.

(प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

वीगो

25 ग्राम

सोनाटा 70

25 मि.ली

या नंतर पोंग्यामध्ये कार्बोप्युरॉन (फ्युरी) 2-2 दाणे सोडणे.

♦️ दुसरी फवारणी :35 ते 40 दिवसात करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

अविष्कार

5 मि.ली

फायर 101

25 मी.ली

♦️ खताची दुसरी मात्रा :लागवडीपासुन 45 ते 48 दिवसात दुसरी मात्रा द्यावी.

(प्रति एकरी प्रमान, सोबत पाणी देणे)

10:26:26

1 बॅग

पोटॅश

25 किलो

विघ्नहर्ता विकास किट

25 किलो


♦️ तिसरी फवारणी :कणीस तयार होतांना तिसरी फवारणी घ्यावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

जीब्रॅक्स

25 मि.ली

संपदा

25 ग्राम

फायर 101

25 मि.ली


♦️ शेवटची फवारणी :लागवडी पासुन 65 ते 70 दिवसात खालील फवारणी करावी.

(प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

महाझिंक

25 ग्राम

फेरोसील

25 ग्राम

बालबोरॉन

25 ग्राम

लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्यास फायर 101

30 मि.ली

नोट

♦️लागवडी पासुन 20 दिवसापर्यंत शेतात पाणी साठवुन राहणार नाही यांची काळजी घ्यावी अन्यथा पिक पिवळे पडुन मर होण्याची शक्यता असते.

♦️उगवण 5 ते 6 दिवसांत होत असतांना कोवळे कोंब पक्षी खातात. दाणे भरतांना सुध्दा राखण करावी.

♦️लागवडी पासुन 35 दिवसापर्यंत खुरपनी करून रान मोकळे ठेवावे म्हणजे पिकाची वाढ जोमाने होते. खुरपणी करतांना ताटांना आधारासाठी मातीचा थर लावावा.

♦️लागवडीपासुन 50 ते 60 दिवसात वरच्या टोकापासुन तुरा येतो व त्या नंतर 2 ते 3 दिवसात मधल्या भागातुन कणीस बाहेर पडते. तुऱ्यातील पुंकेसर व कणसातले स्त्रीकेसर यांचे संयोगीकरण घडुन येते. दरम्यान धुई धुआरी पडल्यास कणसात दाणे व्यवस्थित भरत नाही अशा वेळेस बांधावर संध्याकाळी शेकोटी पेटवुन धुर करावा. व दुसर्या दिवशीबलवान - 25 मीलीयुपीएल चे साफ 20 ग्रामप्रती पंप फवारणी करावी.

♦️मका पिकावर येणारे रोग म्हणजे खोडकिडा, घोडे, लष्करी अळी व कणसातील अळी. परंतु आपल्या तंत्राप्रमाणे फवारण्या व मशागती मध्ये यांचा बंदोबस्त केलेला असतो.