भुईमूग
Category
तेलबिया
भुईमुंग पिक नियोजन
♦️भुईमुंग हे बहुउपयोगी पिक महाराष्ट्रात अनेक भागात घेतले जाते. खाद्यतेल देणारे हे पिक जनावरांसाठी उत्तम पेंड सुध्दा देते. खरीप, रब्बी व उन्हाळ्यात सुध्दा पिक घेता येते. भुईमुंग वरील किड व रोग व्यवस्थित पणे नियंत्रणात ठेवल्यास उत्पादन चांगले घेता येते.
♦️ भुईमुगावरील किड :मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, हुमणी.
♦️ भुईमुंगावरील रोग :पानावरील ठिपके (टिक्का), तांबेरा कळी, करपा, मर किंवा मुळकुज, माझ्या तंत्रामध्ये वरील किडींचा व रोगांचा बंदोबस्त फवारण्यामधुन करण्याचा प्रयत्न केला आहे.
♦️पाऊस पडण्याचा कालावधी कमी असलेल्या भागात जसे पाऊस जुन जुलै मध्ये सुरु होवुन सप्टेंबर अखेर बंद होत असल्यास अशा भागात कमी कालावधीचे वाण 90 ते 120 दिवसाचे उपटया जातीचे बियाणे निवडतात व जुन महिन्यापासुन नोव्हेंबर अखेर पर्यंत ज्या भागात पाऊस चालु असतो. अशा भागात 120 ते 150 दिवसात तयार होणारे वाण पसऱ्या व निमपसऱ्या जातीचे घेतल्या जातात.
♦️ जमिनीची मशागत :हलकी ते मध्यम व पाण्याचा निचरा होणारी जमिन जी भुसभुशीत असणे आवश्यक आहे. चिबाड अथवा चोपन जमिनीत भुईमुंग लागवड करु नये. सखोल नांगरट करून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देवुन जमिन भुसभुशीत करावी. तयार केलेले शेणखत असल्यास घ्यावे, सपाटीकरण केलेल्या जमिनीवर पाणी देण्यासाठी 2 ते 4 मीटर रुंदीचे सारे तयार करावेत.
♦️ बियाणे निवड प्रक्रिया :उन्हाळी लागवड करावयाची असल्यास ए.स.बी 11, टि.जी 17, टि.ए.जी 24, आय.सी.एस. 11, एम 13 खरीपा करिता बी. 95, फुले प्रगती, टि.एम. व्ही. 10 हे वाण निवडावे. बाजारात सुध्दा संकरित व सुधारीत बरेच वाण उपलब्ध असतात. उन्हाळी भुईमुंग लागवड करतांना पाण्याचे नियोजन आपल्याकडे व्यवस्थित आहे काय याचा विचार करावा.
♦️ बियाणे प्रक्रिया :प्रति एकरी 40 किलो बियाणे घेवून त्यास बीज प्रक्रिया करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
बावीस्टीन | 100 ग्राम |
♦️या दोन्ही घटकांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करावी व रात्रभर वाळु द्यावे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात पेरणी करुन मे महिन्यात पिक काढल्यावर खरीपा करिता जमिन तयार करता येईल.
♦️ भुईमुंग पेरणी :ओल करून वाफसा झाल्यावर पाभरीच्या साहायाने अथवा टोकन पध्दतीने पेरणी करावी. साधारणत: दोन ओळीतील अंतर 12 इंच (1 फुट) दोन रोपातील अंतर 6 इंच ठेवावे. पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर दिड फुटाचे ठेवावे. बियाणे 2 ते 3 इंच खोल मातीत पेरावे. पेरणी टोकन पध्दतीने केल्यास एका ठिकाणी दोन (2) बिया टाकाव्या, जास्त उताराच्या जमिनीवर पेरणी उताराच्या आडव्या दिशेने करावी. उगवणीच्या काळात कावळे व इतर पक्षी बियाणे खातात या वेळसे राखण करावी व नांगे आढळून आल्यास ताबडतोब भरावे.
( प्रति एकरी यांचे मिश्रण पेरावे ) | |
|---|---|
डि.ए.पी | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
युरीया | 25 किलो |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
पोटॅश | 25 किलो |
♦️पेरणी सोबत शक्य नसल्यास नंतरही खत देता येते. भुईमुंगास जास्त पाणी दिले गेले तर पाने पिवळी पडतात. अशा वेळेसे पानावरील अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते तसेच लोह व जस्त कमी असल्यास पाने पिवळी पडतात अशा वेळेस ----- प्रति एकरी शिंपल्यास वरील समस्या आटोक्यात येईल
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
सुफर्ट | 10 किलो |
युरीया | 25 किलो |
♦️ पहिली फवारणी :लागवडीपासुन 22 ते 24 दिवसात पहिली फवारणी करावी म्हणजे भरपूर फुटवे तयार होतील व पांढऱ्या मुळया सुदृढ होतील.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
फायर-101 | 25 मी.ली |
महाझिंक | 20 ग्राम |
♦️अधिक पातळ झाले असल्यास या फवारणी नंतर अधिक फुटवे लागण्यास मद्त होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
चॅम्पियन | 1 मिली |
गोल्ड रूट टॅबलेट | 1 गोळी |
♦️ दुसरी फवारणी :पेरणी पासुन 40 ते 45 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तिमान गोल्ड | 25 मी.ली |
रोको | 20 ग्राम |
सोनाटा - 70 | 20 मि.ली |
♦️या फवारणी नंतर 5 दिवसाच्या अंतराने खालील फवारणी केल्यास पुन्हा अधिक शेंगा लागण्यास मद्त होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
फ्लॉवर किंग | 1 मिली |
फायर-101 | 25 मी.ली |
♦️या वेळेस फुलकिडे, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव असतो. पिक वाढीच्या तसेच फुलोऱ्याच्या अवस्थेपासुन शेंगा तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत पिकाला भरपूर ओलाव्याची आवश्यकता असते. काढणीच्या 20 दिवस अगोदर पासुन पाण्याची गरज कमी होते. उन्हाळी लागवडीत 8 ते 10 दिवसात मध्यम जमिनीला व 12 ते 15 दिवसाच्या अंतराने भारी जमिनीला पाण्याचे नियोजन करावे. शेंगा तयार होण्याची अवस्था 60 ते 65 दिवसानंतर चालु होते. यावेळेस एक आळवणी करावी.
♦️ आळवणी :
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
जीब्रॅक्स | 100 मिली |
♦️यानंतर लगेच 4-5 दिवसांत फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
सोनाटा-70 | 25 मि.ली |
♦️यानंतर 2 ते 3 दिवसात खताची दुसरी मात्रा खालील प्रमाणे द्यावी व पाणी द्यावे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
पोटॅश | 25 किलो |
विघ्नहर्ता विकास किट | 25 किलो |
20:20:0:13 | 1 बॅग |
♦️आऱ्या जमिनीत घुसण्याची अवस्था 50 ते 60 दिवसात येते, यावेळेस एनर्जी हे जिवाणू असलेले द्रावण प्रति एकरी 2 लि. सोडावे. म्हणजे जमिन भुसभूशीत होवून आऱ्या जमिनीत व्यवस्थित घुसतील व जमिन टनक राहणार नाही.
♦️ पिकाची काढणी :पिक परिपक्व झाल्यानंतर पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगाच्या टरफलाची आतील बाजु काळसर दिसते. अश्यावेळेसच पिक काढावे. साधारणपणे 10 क्विंटल पर्यंत प्रति एकरी वाळलेले शेंगांचे उत्पादन घेता येईल.
♦️या नंतर प्रत्येक 10 दिवसाला विद्राव्य खते सोडावी.
(प्रमाण : प्रति एकर) | |
|---|---|
19:19:19 | 8 किलो |
12:61:0 | 8 किलो |
13:0:45 | 8 किलो |
0:0:50 | 8 किलो |
♦️वरील सर्व खत 10 दिवसाच्या अंतराने तीनदा सोडावे म्हणजे 24- 24 किलो प्रत्येक खत ठिबक व्दारे सोडण्यात येणार आहे व याला चार महिने म्हणजे (120 दिवस) लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 5 तारखेपासुन 12 तारखेपर्यंत खालील दोन घटक न चुकता सोडावयाचे आहे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1 किलो |
ब्ल्यूकाँपर | 50 ग्राम |
जीब्रॅक्स | 1 लिटर |
♦️ टिप :पिकाला कोरे तणनाशक वापरु नये प्रत्येक पंपात 20 ग्राम स्काय गोल्ड जेल किंवा कॅप्टन - 30 मि.ली टाकणे आवश्यक आहे. जर चुकून आपल्या पिकाला कंद अळी लागली व सड लागत असेल तर प्रति एकरीडेन्टासु 100 ग्राम किंवा लिसेंन्टा 100 ग्राम किंवा डेसिस 100 मि.लीया पैकी कोणतेही एक वफायर -101 - 250 मि.ली.सोडल्यास (प्रति एकरी) कंद अळी किंवा हुमणी वरती येऊन मरेल.