मुग व उडीद

मुग व उडीद

Category

धान्य पिके

मुग व उडीद

मुग व उडीद पिक नियोजन

मुग किंवा उडीद हे दाळवर्गीय पिक असुन महाराष्ट्रात बहुतांश भागात हे दोन्ही पिक घेतल्या जाते. काही भागात खरीप हंगामात व काही भागात रब्बी हंगामात सुध्दा ही पिके घेतात. वेगवेगळ्या जमिनीत 6 क्विंटल ते 12 क्विंटल पर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते. माहिती व नियोजन नसल्यामुळे प्रति एकरी 3 ते 4 क्विंटल वरच शेतकरी समाधानी असतात. या पिकावर येणारे मुख्य किडी व रोग खालील प्रमाणे.

♦️ किडी :खोडमाशी, पांढरी माशी, फुलकिडे, मावा, तुडतुडे, केसाळ अळी, लाल केसाळ अळी, हिरवी उंट अळी.

♦️ रोग :भुरी, मुळकुंज, करपा, पिवळा/यलो (मोजॅक), लिफकर्ल इत्यादी वरील सर्व किटक व रोगाना आटोक्यात ठेवून उत्पादन घेण्याचा प्रयत्न या तंत्रानुसार केला आहे. खताची मात्रा फवारणीचे घटक याच पध्दतीने ठरविण्यात आले आहे कि पिक निरोगी राहून किमान उत्पादन 10 ते 12 क्विंटल पर्यंत घेता येते.

♦️ बियाणे निवड व प्रक्रिया :मुग किंवा उडीद बियाणे बाजारात उपलब्ध असलेले आवडीनुसार निवडावे. अथवा घरचे बियाणे चांगले असल्यास ते ही आपण घेवू शकता. प्रति एकरी 5 किलो बियाणे घ्यावे व त्यास बिज प्रक्रिया खालील प्रमाणे करावी.

स्कायगोल्ड जेल

50 ग्राम

बावीस्टीन

50 ग्राम

या दोन्ही घटकांचे द्रावण करून बिज प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळू द्यावे.

♦️ अंतर :2 सरीमधील अंतर 18 ते 24 इंच म्हणजेच (1.5 ते 2 फुट) ठेवावे.

♦️ पेरणी :प्रति एकरी 5 किलो बियाणे घेऊन सोबत खालील खात टाकावे

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो


♦️ पहिली फवारणी :पेरणी पासुन 16 ते 18 दिवसात पहिली फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

एलीयट

20 ग्राम

फायर - 101

25 मि.ली

त्यानंतर खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

चॅम्पियन

1 मिली

गोल्ड रूट टॅबलेट

1 गोळी


♦️ दुसरी फवारणी :आपल्या पिकावर 10-20 फुले दिसल्या बरोबर 30 किलो युरिया एकरी शिंपुन पाणी सोडावे व दुसऱ्या दिवशी खालीलप्रमाणे फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

5 मि.ली

शक्तिमान गोल्ड

25 मि.ली

टील्ट

20 मि.ली

सोनाटा - 70

25 मि.ली

या फवारणी नंतर 5 दिवसाच्या अंतराने खालील प्रमाणे फवारणी केल्यास पुन्हा अधिक शेंगा लागण्यास मदत होईल :

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

फ्लॉवर किंग

1 मि.ली

फायर 101

25 मि.ली


♦️ तिसरी फवारणी :शेंगा बनत असतांना फवारणी करावी. प्रति 15 लिटर पंप या प्रमाणे खते व फवारणीचे नियोजन केल्यास मुग व उडीद पिकांचे भरघोस उत्पन्न घेता येईल.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

जीब्रॅक्स

25 मि.ली

फायर-101

25 मि.ली