अद्रक
Category
कंद पिके
अद्रक पिक नियोजन
अद्रक हे भारतीयांच्या आहारातील महत्वाचे घटक असुन यामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. रोजच्या स्वयंपाकात मसाला म्हणून गरज असल्याने आल्याची मागणी कायम स्वरूपात राहते. या पिकांपासुन सुंठ, अद्रकीचे तेल बनविण्यात येते. लागवडीनंतर 6 महिन्यांपासून पुढे केव्हाही काढता येणारे व भाव नसल्यास जमिनीत सांभाळता येणारे हे पिक बहुतांशी भागात जुन महिन्यात लागवड करून मार्च महिन्यात काढता येते.
♦️दर दोन वर्षांनी अद्रक पिकाचे भाव चांगले भेटत असतात कारण उत्पादन वाढले की भाव ढासळतात व पुढील वर्षी शेतकरी हे उत्पादन घेण्याचे टाळतात. तरीपण एकरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन येत असल्यामुळे हे पिक परवडते. महाराष्ट्रात स्थानिक जातीचे माहिम वाण प्रचलित आहे.
♦️ बियाणे निवड:बुरशीयुक्त छिद्र पडलेले अथवा सड लागलेले बेणे मुळीच घेवु नये, 1 ते 2 इंचाचे व 25 ते 50 ग्राम वजनाचे ठोकर तुकडे निवडावेत, ज्यास एक ते दोन डोळे असावेत.
♦️ बियाणे प्रक्रिया :प्रति एकरी 6.5 क्विंटल बेणे घ्यावे व यास खालील प्रमाणे बीजप्रक्रिया करून घ्यावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 250 ग्राम |
ब्लु कॉपर | 250 ग्राम |
क्लोरो 50% | 250 मि.ली |
या तीनही घटकांचे 100 लिटर पाणी घेवून द्रावण तयार करावे व त्यातून हे बेणे ढवळून काढावे व हडकु द्यावे.
♦️ जमिनीची मशागत व अंतर :एप्रिल महिन्यात आडवी उभी सखोल नांगरटी करुन कुळवाच्या 3/4 पाळ्या करून जमिन ढेकळे विरहित व भुसभुशीत करावी. 40 ते 45 दिवस तापू द्यावी. रोटर करून पाळी करावी.
♦️ लागवड :बेडवर कोळप्याने 1 फुटाची (12 इंच) सरळ सरी ओढुन घ्यावी. दोन्ही बाजुला 10 - 10 इंचावर समांतर पध्दतीने 2 ते 3 इंच खोल शेंगाचे टोकन करावे.
पहिली आळवणी (ड्रिप व्दारे) :लागवडीपासुन 5 ते 7 दिवसात खालील घटक सोडावे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1 किलो |
ब्लु कॉपर | 500 ग्राम |
फायर -101 | 250 मि.ली |
या घटकांचे मिश्रण 200 लिटर पाण्यात ड्रीप व्दारे सोडावे.
♦️ दुसरी आळवणी :लागवडी पासुन 14 ते 16 दिवसात दूसरी आळवणी करावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
सुप्रीमो | 2 लिटर |
मिरॅकल | 1 लिटर |
♦️ खताची पहिली मात्रा :लागवडीपासुन 22 ते 24 दिवसात खताचा डोस टाकावा.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
डि.ए.पी | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
युरीया | 25 किलो |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
निबोणी पेंड | 1 बॅग |
♦️ पहिली फवारणी :लागवडीपासुन 28 ते 32 दिवसात पहिली फवारणी करावी.
( प्रमाण : 15 लिटर प्रती पंप ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅक प्लस | 5 मि.ली |
रोको | 20 ग्राम |
सोनाटा-70 | 25 मि.ली |
रण 80 | 5 मि.ली |
♦️या नंतर खालील फवारणी 15 लिटर प्रती पंप प्रमाणे करावी.
चॅम्पियन | 1 मि.ली |
गोल्ड रूट टॅबलेट | 1 गोळी |
♦️या नंतर लगेच आपल्या शेतामध्ये लाईट लावावा. तसेच प्रति एकरी 8 ते 10 कामगंध सापळे लावावे व कंद माशीच्या पतंगाचा नायनाट करावा. लाईट अडीच ते तीन महिन्यापर्यंत चालु ठेवावे. वेळोवेळी खुरपनी करून तण काढीत जावे. बेडच्या बाजुस खांदनी करून झाडांना मातीची भर द्यावी. उगवणी नंतर 3 महिने पिकाला फुट येवुन ते पोसत असतात. 6 ते 7 महिन्याने फुलांचे कोंब येते व आठव्या महिन्यापासुन 11 व्या महिन्यापर्यंत गड्ड्याची वाढ जोमाने होते या मुळे कोणत्या वेळेसे कोणते घटक द्यावे हे ठरवावे लागते.
♦️ दुसरी फवारणी :लागवडीपासुन 38 ते 40 दिवसात पिकावर दुसरी फवारणी करावी.
( प्रमाण : 15 लिटर प्रती पंप ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
एलीयट | 20 ग्राम |
फायर - 101 | 25 मि.ली |
♦️ खताची दुसरी मात्रा :लागवडीपासुन 52 ते 54 दिवसात खताची मात्रा द्यावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
पोटॅश | 25 किलो |
विघ्नहर्ता विकास किट | 25 किलो |
♦️ तिसरी फवारणी :लागवडी पासुन 70 ते 75 दिवसात तिसरी फवारणी करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
अविष्कार | 5 मि.ली |
सोनाटा - 70 | 25 मि.ली |
♦️ चौथी फवारणी :लागवडी पासुन 90 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
महाझिंक | 25 ग्राम |
बलवान | 25 मि.ली |
फेरोसील | 25 ग्राम |
बाल बोरॉन | 30 ग्राम |
♦️या नंतर प्रत्येक 10 दिवसाला विद्राव्य खते सोडावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
19:19:19 | 8 किलो |
12:61:0 | 8 किलो |
13:0:45 | 8 किलो |
0:0:50 | 8 किलो |
♦️वरील सर्व खत 10 दिवसाच्या अंतराने तीनदा सोडावे म्हणजे 24- 24 किलो. प्रत्येक खत ठिबक व्दारे सोडण्यात यावे व याला चार महिने म्हणजे (120 दिवस) लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 5 तारखेपासुन 12 तारखेपर्यंत खालील दोन घटक न चुकता सोडावयाचे आहे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्काय गोल्ड जेल | 1 किलो |
जीब्रॅक्स | 1 लिटर |
♦️ टिप 1 :पिकाला कोरे तणनाशक वापरु नये प्रत्येक पंपातस्काय गोल्ड जेल - 20 ग्रामकिंवाकॅप्टन - 30 मीलीटाकणे आवश्यक आहे. जर चुकून आपल्या पिकाला कंद अळी लागली व सड लागत असेल तर प्रति एकरीडेन्टासु - 100 ग्रामकिंवालिसेंन्टा - 100 ग्रामकिंवाडेसिस - 100 मि.लीया पैकी कोणतेही एक वफायर 101 - 250 मि.लीसोडल्यास (प्रति एकरी) कंद अळी किंवा हुमणी वरती येऊन मरेल.
♦️ टिप 2 :पिकाला मर लागत असल्यास भु-धन - 1 लिटर प्रति एकरी ड्रीप द्वारे सोडावे म्हणजे ताबडतोप मर रोग थांबेल.
♦️ टिप 3 :प्रत्येक फवारणी मध्ये सीलटाक 5 मि.ली प्रति पापं हे स्टिकर अवश्य घ्यावे.