मिरची
Category
पालेभाज्या
मिरची पिक नियोजन
महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगात रोजच्या आहारात लागणारा महत्वाचा घटक मिरची हा होय, महाराष्ट्रात सर्व दूर घेण्यात येणारे हे पिक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला सहकार्य करणारे पिक होय, जिरायत तसेच ओलीताखाली मिरचीचे पीक घेता येते. खरीप, रब्बी व उन्हाळी या तिनही हंगामात घेता येणारे हे पिक होय. महाराष्ट्रातील मिरचीची परदेशातही मोठी मागणी आहे.
♦️ रोप तयार करणे :मिरची हे पीक रोपे तयार करून लागवड करावी लागते रोप लागवडीसाठी 4 ते 5 गुंठे क्षेत्रात रोपवाटिका तयार करावी. निचरा होणारी जमिन निवडावी. चुनखडीच्या क्षेत्रात रोपे टाकू नये. हे क्षेत्र चांगल्या प्रकारे भुसभूशीत करून घ्यावे. व गादी वाफे तयार करावेत. गादी वाफे तळात एक मिटर रुंद व एक फुट उंच असावेत व लांबी 2 मीटर व रुंदी अडीच ते तीन फुटापर्यंत करावी. गादी वाफे तयार करतांनाच :
डि.ए.पी | 1 किलो |
ब्लॅकडायमंड | 1 किलो |
सुफर्ट | 1 किलो |
या घटकांचे मिश्रण करून वाफ्यांवर शिपावेत. एक गुंठा क्षेत्रात 16 ते 18 वाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चार इंचाच्या अंतरावर बोटाने अर्धा इंच खोलीच्या रेषा ओढाव्यात. प्रथम बी हलके टाकावेत व मातीने झाकून घ्यावेत व झारीने हलके पाणी द्यावे. दोन ते तीन दिवसात परत झारीने पाणी द्यावे. 6 ते 7 दिवसात स्कायगोल्ड जेल 50 ग्राम बावीस्टीन 30 ग्राम झारीमध्ये कालवून वाफ्यात पाणी सोडून त्या पाण्यामध्ये हे द्रावण सोडावे. ही रोपे 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान लागवडीसाठी काढता येतात. रोपाच्या क्षेत्रावर नायलॉन जाळीचे आच्छादन केल्यास उत्तम ठरते.
♦️ जमिनीची मशागत :जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करुन घ्यावी. रोटर करावे व पाळी करून घ्यावी. प्रक्रिया केलेले शेणखत असल्यास पसरवून घ्यावे. कुळवाच्या 3-4 पाळ्या करुन जमिन भुसभुशीत करता येईल.
♦️ रोप प्रक्रिया :लागवड करण्यापूर्वी रोप प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
बावीस्टीन | 50 ग्राम |
घेवून रोपांवर मुळ्यापासुन शेड्यांपर्यंत फवारणी करावी किंवा 20 लिटर पाणी तयार करून त्यातून रोपे बुडवून काढावीत.
♦️ लागवड :लेव्हल व पूर्व मशागत केल्यानंतर लागवडी करीता सऱ्या पाडाव्यात. व हलक्या जमिनीत 3 x 3 फुटावर व ओलीता खालील भारी जमिनीत 5 x 2 फुटावर उत्तम अंतर ठरते. 4360 ते 4840 रोपे प्रति एकरी लागतात या अंतरामुळे पाण्याची बचत झाडाची उत्तम वाढ, अंतर मशागत, तोडणीसाठी सोपे जाते. ठिबक असल्यास विद्राव्य खते देता येतात व खताची बचत होते.
♦️ पहिली ड्रिंचीग :लागवडी पासुन 3 ते 4 दिवसांत पहिली ड्रिंचीग करावी.
(15 लिटर प्रती पंप ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
ब्लु कॉपर | 50 ग्राम |
19:19:19 | 100 ग्राम |
( ठिबक असल्यास प्रती एकरी 200 लिटर - द्रावण ठिबक द्वारे सोडावे ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1 किलो |
ब्लु कॉपर | 500 ग्राम |
19:19:19 | 2 किलो |
♦️ खताची पहिली मात्रा :लागवडी पासुन 16 ते 18 दिवसात द्यावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
पोटॅश | 25 किलो |
सुफर्ट | 10 किलो |
ब्लॅकडायमंड | 10 किलो |
♦️ टिप :जर मल्चिंग करावयाचे असल्यास तत्पूर्वी हे खत टाकावे.
♦️ पहिली फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
वीगो | 25 मि.ली |
सोनाटा - 70 | 25 मि.ली |
यानंतर बरोबर 7 व्या दिवशी पुढील फवारणी करावी.
♦️ दुसरी फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
चॅम्पियन | 1 मिली |
गोल्ड रूट टॅबलेट | 1 गोळी |
♦️ तिसरी फवारणी :लागवडी पासुन 35 ते 45 दिवसात फुल धारणा होत असतांना दुसरी फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मिली |
शक्तीमान गोल्ड | 25 मिली |
किंगकोंग (मिश्रण) | 25 मीली |
♦️ चवथी फवारणी :लागवडी पासून 55 ते 60 दिवसात तिसरी फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
फायर-101 | 25 मिली |
♦️ पाचवी फवारणी :
(15 लिटर प्रती पंप ) | |
|---|---|
बलवान | 25 मिली |
एलीयट | 15 ग्राम |
♦️2 लिटर एनर्जी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
♦️ खताचा डोस :
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
डि.ए.पी | 1 बॅग |
विघ्नहर्ता विकास कीट | 25 किलो |
या वेळेस आपला पहिला तोडा होण्याची शक्यता असते. तोडा झाल्यानंतर लगेच खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
गोल्ड रूट टॅबलेट | 1 गोळी |
फ्लावर किंग | 1 मिली |
किंगकोंग | 25 मि.ली |
♦️यानंतर प्रत्येक तोड्या नंतर दुसरी फवारणी वेळोवेळी करावी.
♦️ टिप :पांढरी माशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्यास व्हिजील - 8 मिली प्रति पंप फवारणी करावी. तसेच चुरडा-मुरडा, कोकडा असल्यास किंगकोंग- 25 मिली हा सर्वात रामबाण घटक आहे. जर ठिबक असल्यास12:61:0, 0:0:50, 13:40:13हि विद्राव्य खते एकरी 5 ते 6 किलो टाकावे, फुल गळ असल्यास फवारणी मध्ये बाल बोरॉन चा वापर करावा.