केळी
Category
फळबाग
केळी लागवड
एक अत्यंत पौष्टिक फळ असलेली केळी हे लहान मुलांपासून ते वयोवृध्दा पर्यंत यांचा स्वाद आणि गोडवा सर्वांनाच आवडतो. फॉस्फरसचे लक्षणिय प्रमाण तसेच प्रथिने व खनिज द्रव्याचे प्रमाण सफरचंदा पेक्षा हि दुप्पट असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत उपयुक्त असतात. A,B,C, D हे जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून यांचा चांगला उपयोग होतो. लहान मुलांना जंत होतात, त्यांना निदान आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केळ फूलांची भाजी खाऊ घालावी. पिकलेली केळी तूप साखर घालून खाल्ल्यास पित्त रोगावर लवकर आराम पडतो. लहान मुलांना माती खाण्यास सवय सोडवावयाची असल्यास मधाबरोबर केळी खाऊ घालावी. असे बहुउपयोगी असलेले हे पीक महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे.
जमिनीची मशागत
♦️ पूर्व मशागत :केळी पिकाची मूळे अत्यंत नाजूक आणि मांसल असतात. मूख्य मुळे झाडाला आधार देण्याचे कार्य करतात आणि दुय्यम तंतुमय मुळे झाडाला अन्नद्रव्य व पाणी पूरविण्याचे कार्य करतात. केळी पिकाची मुळे जमिनीत खोलवर जातात आणि आडव्या पसरतात. त्यामुळे मशागत होणे गरजेचे आहे. जमिनीची खोल आडवी उभी नागरंट करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या करून जमिन भुसभुशीत करावी.
♦️ लागवड अंतर :लागवड अंतर साधारणपणे 5 x 5 फूट 1742 झाडे किंवा 5 x 6 फूट 1452 झाडे , किंवा 6 x 6 फूट 1210 झाडे लागतात.
♦️रोपे लागवडीच्या वेळी अगोदर 0.5 x 0.5 x 0.5 मीटर खोल खड्डा करावा. या खड्यामध्ये खालील घटक टाकावे. (प्रती खड्डा)
( प्रमाण प्रती रोप ) | |
|---|---|
डि.ए.पी | 100 ग्राम |
सुफर्ट | 100 ग्राम |
निंबोळी पेंड | 200 ग्राम |
ब्लॅक डायमंड | 100 ग्राम |
कुजलेले शेणखत खत असल्यास | 200 ग्राम |
वरील प्रमाणे सर्व मिश्रण थोड्याशा मातीत मिसळून खड्डा व्यवस्थित भरावा.
जात निवड
♦️ बसराई :या जातीला खाणदेशी, भुसावळ, वामणकेळ या नावाने सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळा पैकी 75% या जातीने व्यापले आहे. हि जात बांध्याने ठेंगणी असून 5 ते 7 फुटा पर्यंत उंच उत्कृष्ट व दर्जेदार फळे देणारी, घड मोठे असून एक सारखे आकाराचे व सहा ते सात फण्या असलेले एक फणीला 12 ते 13 केळी असलेले 15 ते 25 किलो पर्यंत एका घडाचे वजन असते. फळाचा आकार मोठा व गोडीही जास्त असते. कडक थंडीचा या पिकावर मोठा दुष्परीणाम होतो.
♦️ अर्धापुरी :मराठवाडा कृर्षी विद्यापीठाने चाचणी घेऊन अर्धापूरी या बसराईचाच उपवाण प्रसारीत केला आहे. हा बसराईपेक्षा सरस दिसून आला.
♦️ हरीसाल (बॉम्बे ग्रीन) :मुंबईच्या बाजारपेठेत लोकप्रिय असलेली हि उंच वाढणारी (11 ते 14-फूट) झाडांची पाने अरूंद व लांब असतात घड 25 ते 35 किलो वजनाचा असतो. त्याला 150 ते 160 केळी असतात. हे पिकल्यानंतरही साल हिरवी राहते. उंच वाढणारी असल्यामुळे वादळ, वारे यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.
♦️ श्रीमंती :ही जात बसराई मधूनच निसर्गत: बदल करून निवड पध्दतीने विकसित झालेली आहे. झाडाची उंची 2 मीटर पर्यंत तर कालावधी 16 ते 18 महिने फळाची लांबी 20 ते 22 सेंमी. घडांचे सरासरी वजन 20 ते 25 किलो जळगाव जिल्ह्यातील शेंदुरणी या भागात मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय ग्रेडनैन, जिनाईन. BRS 1, लालवेलची सफेद वेलची, राजेळी, मुठेळी, राजापूरी (व्हाल्हा) अश्या अनेक विकसित जाती केळी पिका मध्ये आहेत.
♦️ रोप प्रक्रिया :
( प्रति हजार रोप) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 250 ग्राम |
बाविस्टीन | 250 ग्राम |
फायर 101 | 250 मि.ली |
या तिन्ही घटकाचे मिश्रण करून 200 लिटर द्रावण तयार करावे. 100 ली, 100 ली द्रावण वेगळे करावे व किमान 100 लिटर मधून 500 रोप ढवळून काढावे व ते पाणी शेतात शिंपून दयावे. या पद्धतीनी रोप प्रक्रिया करावी.
♦️ लागवड:(मृग बाग- जून लागवड, कांदे बाग - ऑक्टोबर) खताचे मिश्रण टाकलेल्या गड्यामध्ये मधोमध रोप लागवड करावी व चांगल्या प्रकारे भर टाकावे.
♦️ पहिली आळवणी (ड्रिंचिंग, ड्रिप) :लागवडी यासून 15 ते 20 दिवसात ठिबक असल्यास खालील घटक सोडावेत. ठिबक नसल्यास आळवणी करावी. या घटकामुळे पांढर्या मुळ्या सुदृढ होऊन खोलवर जाते व बुरशीचे नायनाट होईल.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 2 किलों |
ब्लू कॉपर | 750 ग्राम |
19:19:19 | 3 किलो |
♦️ पहिली फवारणी :लागवडी नंतर 30 ते 35 दिवसात पहिली फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 25 मि.ली |
रोको | 20 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
या फवारणी मुळे केळीची पाने फूटून व्यवस्थित वाढ होते व हिरवेपणा टिकून राहतो.
♦️ दुसरी ड्रिंचिंग :लागवडी पासून 40 ते 45 दिवसात करावी.
सुप्रीमो | 2 लिटर |
मिरॅकल | 2 लिटर |
200 लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे प्रति एकरी सोडावे. यामूळे झाडाची वाढ झपाट्याने होऊन झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होईल.
♦️ खताची पहिली मात्रा :लागवडीपासून 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान खताची पहिली मात्रा दयावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
डी.ए. पी | 2 बॅग |
युरीया | 1 बॅग |
पोटॅश | 1 बॅग |
ब्लॅकडायमंड | 30 किलो |
सुफर्ट | 30 किलो |
♦️ दुसरी फवारणी :लागवडी नंतर 51 ते 60 दिवसा दरम्यान दुसरी फवारणी करावी.
(प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
एलीयट | 15 ग्राम |
रण 80 | 5 मि.ली |
♦️ खताची दुसरी मात्रा :लागवडी नंतर 80 ते 85 दिवसात दुसरी खताची मात्रा दयावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
युरीया | 2 बॅग |
विघ्नहर्ता विकास कीट | 25 किलो |
♦️ पोंगे भरणे :लागवडीपासून 90 ते 95 दिवसाच्या दरम्यान पोंगे भरण्याचे कार्य करावे यावेळेस
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 8 मिली |
संपदा | 30 ग्राम |
मॅग्नेशियम | 100 ग्राम |
13:40:13 | 100 ग्राम |
♦️ खताचा तीसरा डोस :लागवडी पासून 120 ते 130 दिवसा दरम्यान खालील प्रमाणे खताची मात्रा द्यावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
10:26:26 | 2 बॅग |
युरीया | 2 बॅग |
सुफर्ट | 20 किलो |
ब्लॅक डायमंड | 20 किलो |
♦️ पिल कापणे :या नंतर पिक वाढीच्या कालावधीत केळीस लागून येणारी पिल प्रत्येक आठवड्याने किंवा पंधरवड्याने कापणे गरजेचे आहे. जेणे करून पाणी व खताचे विभाजन होऊ नये. जमिन नेहमी भुसभूशीत ठेवण्यासाठी लागवडीनंतर 3 महिन्या पर्यंत कुळवाच्या पाळ्या घालाव्यात व झाडाला भर घालावी तसेच तणाचा बंदोबस्त वेळोवेळी करावा.
♦️ खताची चौथी मात्रा :लागवडी पासून 170 ते 180 दिवसा दरम्यान खताची चौथी मात्रा टाकावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
12:32:16 | 4 बॅग |
युरीया | 2 बॅग |
फेरस सल्फेट | 8 किलो |
यानंतर 7 ते 8 महिन्याच्या दरम्यान कमळ बाहेर येण्यास सुरुवात होते. अश्या वेळेस म्हणजेच केळी घड निसवतानासुप्रीमो - 3 लिटरठिबकद्वारे सोडावे.
♦️केळी घड निसवल्यानंतर खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
0:52:34 | 100 ग्राम |
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
रोको | 15 ग्राम |
या नंतर केळीच्या फळांची साईज वाढवण्या करीता व चकाकी आणण्याकरीता खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 8 मिली |
जीब्रॅक्स | 40 मिली |
बोरॉन | 30 ग्राम |
♦️ घडाला झाकणे :घड बाहेर पडल्यानंतर अती उष्णतेपासून घडाचे संरक्षण करण्या करीता केळीचे वाळलेल्या पानाची पेंढी करून दांड्यापासून खाली घडापर्यंत झाकावे. अन्यथा दांडा काळा पडून व सडून पडण्याची शक्यता असते. किंवा घडाला बारीक पाच मायक्रॉन या गेजच्या प्लास्टिकची बॅग झाकावी. यामुळे फळाची वाढ होणे लांबी वाढणे फळाचा कलर चांगला येणे. तसेच पानांच्या घासण्याने किंवा इतर कारणाने होणारी ईजा टाळता येते व किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
केळी पिकावरील किडी
♦️ कंद पोखरणारा भूंगा :कंदामध्ये राहून हा भूंगा कंद पोखरतो त्यामुळे अर्ध्या कंदासकट केळी जमिनीच्या पृष्टभागापासून कोलमडून पडतात.
♦️ खोड पोखरणारा भुंगा :झाडाच्या खोडावर छिद्रे पाडून झाड पोखरतो, व खातो त्यामुळे झाडाची वाढ होत नाही.
उपाय :खोडावरील छिद्रामध्येफायर 101 - 5 मि.लीइंजेक्शन द्वारे सोडावे.
♦️ सुत्रकृमी :(निमॅटोड) हे जमिनीत असतात व मुळांना हानी पोहचवतात. त्यांच्या अन्नरसावर जगतात. त्यामुळे काळी पडून त्यांच्या गाठी तयार होतात. परिणामत: झाडाची वाढ खुंटते. अन्न रसावर जगतात. त्यामुळे पांढरीमूळे काळी पडून त्यांच्या गाठी तयार होतात.
उपाय :फायर 101 - 100 मि.लीप्रति पंप घेऊन यांची आळवणी करावी व झाडाजवळ झेंडूचे झाड लावावे किंवा फ्युरॉडॉन 10 ग्राम टाकावे.
♦️ करपा :पानावर लहान - लहान पिवळ्या रंगाचे वर्तुळ तयार होतात व ते मोठे होऊन तपकिरी व वरून करडा होत जातो जिथे आद्रता वाढते व सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही व हवा खेळती राहत नाही अशा ठिकाणी करपा लवकर लागतो.
उपाय :ब्ल्यूकॉपर -30 ग्राम + तेजस -25 ग्रामफवारणी करावी. रोगग्रस्त पाने कापून बाग स्वच्छ करावी. अश्या वेळेस पोटॅश व सल्फर ची मात्रा द्यावी.
♦️ पोंगासड :नविन येणारे पान म्हणजेच पोगा कुजतो व अलगद हात लावताच अलगद उपटल्या जाते. मूळ्या सडलेल्या असतात. अशा वेळेस खालील उपाय योजना करावी.
स्ट्रेप्टो सायक्लींन - 3 ग्राम + ब्लू कॉपर - 30 ग्राम
हे प्रती 15 लिटर पंपात घेऊन बुडाला ड्रिंचींग करावी.
♦️ सिगारटोका ( फळ सिगारेट सारखे जळणे ) :फळाची पुढील कडा जळत जाते व फळ कुजते.
उपाय :केळफूल कट केल्यानंतर शेवटच्या फणीत एक केळ ठेवावे व केळफूल कट केल्या ठिकाणी बाविस्टीन 20 ग्राम प्रति पंप घेऊन फवारणी करावी.
विषाणुजन्य रोग
♦️ पर्णगुच्छ :हा रोग भारतात सगळ्या भागात आढळतो. पानांची वाढ थांबून पाने लहान पडतात व एकाच ठिकाणी थांबतात. त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो.
उपाय :रोगग्रस्त दिसता क्षणी झाड उपटून बाहेर गाढावे.
ब्लूकॉपर - 30 ग्राम + फायर 101 - 25 मी.लीप्रती पंप ह्याची फवारणी करावी.
♦️ बनाना बॅक्ट मोझाईक व्हायरस :हा या रोगात झाडाची वाढ खुंटते व घड असल्यास घडावर गुलाबी रेषा दिसतात.
उपाय :वरील प्रमाणे झाड दिसल्यास ताबडतोब उपटून बाहेर फेकावे व बागेच्या अवती भवती वेलवर्गीयाची लागवड करावी. हिवाळ्यात या रोगाची लक्षणे दिसून येतात.
♦️ टिप :
♦️अती जास्त थंडी पिकाला सहन होत नसते. कडाक्याची थंडी असल्यास आपल्या बागेत बांधावर धूपण करावे.
♦️धुवारी किंवा धुके पडल्यास खालील उपाय योजना करावी.
( प्रमाण : प्रति १५ लिटर ) | |
|---|---|
बलवान | 25 मिली |
साफ | 25 ग्राम |
( वॉटर सोल्युबल १ ते १० दिवस ) | |
|---|---|
१९:१९: १९ | ५ किलो |
१२:६१:० | ५ किलो |
युरिया | 7 किलो |
( ६० ते ७० दिवस ) | |
|---|---|
सुप्रीमो | ५ लिटर |
मॅग्नेशिअम | ५ किलो |
( १५० दिवसापर्यंत ) | |
|---|---|
०:५२:३४ | 5 किलो |
१३:०:४५ | 5 किलो |
युरिया | 14 किलो |
( १८० ते २६० दिवसात ) | |
|---|---|
०:०:५० | ५ किलो |
युरिया | ५ किलो |